आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • At The Moment All The Players Are Worried, We Don't Know Why We Are Practicing: Captain Mithali; Criticism Of Management

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:सध्या सर्व खेळाडू माेठ्या चिंतेत, आम्ही सराव का करतोय हेच माहीत नाही : कर्णधार मिताली; व्यवस्थापनावर टीका

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मार्चनंतर भारतीय महिला टीमने सामना खेळला नाही, सध्या आंतरराष्ट्रीय मालिका नियोजन रखडले

भारतीय वनडे महिला संघाची कर्णधार मिताली राज १० महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. कोरोनामुळे मार्चमध्ये टी-२० विश्वचषक फायनलनंतर एकही सामना झाला नाही. सध्या यूएईमध्ये १ ते १० नोव्हेंबरदरम्यान महिला आयपीएल प्रस्तावित आहे, मात्र आंतरराष्ट्रीय सामन्याबाबत कोणतेही नियोजन तयार नाही. पुढील वर्षी होणारी वनडे विश्वचषक स्पर्धा लांबणीवर पडल्याने चिंता वाढली आहे.

मितालीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मितालीने म्हटले की, ‘खेळाडू भविष्याबाबत चिंतित आहेत. त्यांच्याकडे सरावाचा कोणताच उद्देश नाही. आम्हाला स्पर्धेबाबत काहीच माहिती नाही. आम्ही कशासाठी सराव करतोय, हे आम्हास माहिती नाही.’ तिने म्हटले, आम्हाला एका उद्देशाची गरज आहे.

पहिले देशाबाहेर आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची असल्यास त्या दृष्टीने आणि देशांतर्गत असेल तर त्यानुसार सराव करत होतो. मात्र, सध्या आम्ही कशासाठी सराव करतोय, हेच कळत नाही. कधी कधी वाटते की, स्पर्धा किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट नाही तर तयारी का करावी. मितालीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. तीन मार्चच्या अखेरीस आंतरराज्य वनडे स्पर्धा खेळणार होती, मात्र कोरोनामुळे ते शक्य झाले नाही.

मात्र, मितालीने म्हटले, आमच्या सुविधांमध्ये वाढ झाली आहे. आता सरावात बदल झालेला दिसेल. आम्ही पहिले नेटवर किती तास फलंदाजी करत होतो, कमीत कमी १५ गोलंदजांचा सामना करत होतो. मात्र, आता कोरोनामुळे त्यात बदल झाला. आम्हाला वेगवेगळ्या वेळेत सराव करावा लागतोय, केवळ दोन-तीन गोलंदाज समोर असतात. या गोष्टीसाठी खेळाडूंना तयार राहावे लागेल. त्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत. यामुळे सर्व खेळाडू कोरोना संपण्यापूर्वी आपली लय परत मिळवतील. माहितीनुसार, टी-२० विश्वचषकानंतर महिला संघ अडचणीतून जात आहे. सध्या कोणती निवड समिती नाही. त्याचबरोबर मुख्य प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमण यांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. महिला आयपीएलमध्येमोठे खेळाडू सहभागी होण्याची शक्यता कमी असून कारण यादरम्यान ऑस्ट्रेलियात महिला बिग बॅशचे सामने होतील.

युवा खेळाडूंना सांभाळणे आव्हान

करारबद्ध खेळाडू असल्याने आम्ही जैव सुरक्षित वातावरणात राहणे आमची जबाबदारी आहे. सामन्यासाठी अशाप्रकारे पाऊल योग्य आहे. त्यामुळे खेळाडू स्वत:ला सज्ज ठेवू शकतात. मानसिक स्वास्थासाठी तिने म्हटले की, आमच्यासाठी स्पोर्ट््स सायकॉलॉजिस्टचे काही सत्र होतात. आम्ही सहकारी खेळाडूंसोबत त्यावर चर्चा करतो. मात्र, सर्वात मोठी चिंता संघातील युवा खेळाडूंची आहे, जे पदार्पण करणार आहेत. आम्हाला त्यांच्या भविष्यातील चिंता दूर कराव्या लागतील,असेही मिताली म्हणाली.

बातम्या आणखी आहेत...