आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय टी-20:यंदाच्या टी-20 विश्वचषकासाठी ऑडिशन सुरू; आज पहिला सामना

चंद्रेश नारायणन| मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय टी-२० जिंकण्याच्या विक्रमाचा भारत सातत्याने पाठलाग करत आहे. टीम इंडियाने आतापर्यंत सलग १२ टी-२० सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरुवारपासून सुरू होत असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकला, तर सलग सर्वाधिक टी-२० सामने जिंकण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावावर होईल. मात्र, याकडे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे लक्ष नाही. टी-२० चे सांघिक संयोजन करण्यावर त्यांचा भर आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघातील अनेक जागा भरायच्या आहेत. या मालिकेतून काही नियमित खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे ही मालिका त्या जागांच्या दावेदारांसाठी एक संधी आहे. महत्त्वाचे म्हणजे वेगवान गोलंदाजी व अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या योग्य आहे. गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिकने शानदार पुनरागमन केले आहे.

त्याला फलंदाजीतील अष्टपैलू व्यंकटेश अय्यरचे आव्हान असेल. पण हार्दिकच्या उपस्थितीत व्यंकटेशला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे, जोपर्यंत संघ व्यवस्थापन अतिरिक्त वेगवान गोलंदाज, अष्टपैलू खेळाडूंसह खेळण्याचा निर्णय घेत नाही. याशिवाय कुलदीप यादवचा टी-२० मध्ये स्थिरावल्याचा मजबूत दावा आहे. त्याची आतापर्यंत एकदिवसीय आणि कसोटी संघात निवड झाली आहे. मात्र टी-२० मध्ये त्याला फारशा संधी मिळालेल्या नाहीत. मात्र, आयपीएलमध्ये त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्याच्या लहान प्रकारातील कामगिरीकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. त्याने पूर्वीसारखाच आत्मविश्वास मिळवला आहे. १५ वर्षीय संयुक्ता काळे भारताची ‘सिमोन बाइल्स’; ५ सुवर्ण जिंकले

कार्तिक अंतिम षटकांचा स्पेशालिस्ट म्हणून स्थान मिळवू शकतो :
सर्वांच्या नजरा शानदार पुनरागमन करणाऱ्या दिनेश कार्तिकवर आहेत. कार्तिक शेवटच्या षटकांमध्ये स्पेशालिस्ट म्हणून संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. २००७ च्या टी-२० विश्वचषकातही तो संघाचा सदस्य होता. पण पंतच्या उपस्थितीत कार्तिकला संघात स्थान मिळते का, हे पाहावे लागेल. आयपीएलमध्ये पंतचा फॉर्म खराब असला, तरी निवड समिती त्याच्या बाजूने आहे. त्याचबरोबर, मोठे खेळाडू परतले, तर ईशान किशनला आपले स्थान टिकवणे कठीण होईल. सूर्यकुमार यादवच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर काही काळासाठी सुटकेचा नि:श्वास टाकू शकतो. राहुल त्रिपाठी आणि संजू सॅमसन यांच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.

सामन्याच्या एक दिवस आधी कर्णधार राहुल दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर :
मालिकेच्या एक दिवस आधी बुधवारी कर्णधार लोकेश राहुल ग्रोइन दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला. त्याच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला कर्णधार बनवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...