आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:ऑस्ट्रेलिया कसाेटीत नंबर वन : गाैतम गंभीरची आयसीसीच्या क्रमवारी पद्धतीवर टीका

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑस्ट्रेलियन दाैऱ्यावर बीसीसीआयची भूमिका महत्त्वाची ठरेल

भारतीय संघाच्या माजी सलामीवीर फलंदाज गाैतम गंभीरने आता आयसीसीच्या क्रमवारीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ही पद्धत साफ चुकीची असल्याचेही त्याचे मत आहे. नुकतीच आयसीसीने कसाेटीची क्रमवारी जाहीर केली. यामध्ये नंबर वन भारतीय संघावर कुरघाेडी करून ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थानावर धडक मारली. त्यामुळे  ऑस्ट्रेलियाचा संघ नंबर वन कसाेटी संघ ठरला आहे.   

बीसीसीआयची भूमिका महत्त्वाची ठरेल : काेराेनामुळे सर्वच क्रिकेट संघांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियन दाैऱ्याला संमती देण्याची गरज आहे. हा दाैरा बीसीसीआयच्या प्रतिष्ठेत भर घालणारा ठरेल. कारण, क्रिकेट ऑस्ट्रेलिया सध्या आर्थिक अडचणीत आहे, असेही ताे म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...