आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 विश्वचषक:ऑस्ट्रेलिया संघ विजयी; भवितव्य श्रीलंकेच्या हाती!  नबीने साेडले संघाचे नेतृत्व

अॅडिलेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर ग्लेन मॅक्सवेल (नाबाद ५४) आणि जाेश हेझलवूड (२/३३), अॅडम झम्पाने (२/२२) सर्वाेत्तम खेळीतून गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया संघाचा टी-२० विश्वचषकात विजय साजरा केला. मात्र, याच विजयासाठी यजमान ऑस्ट्रेलिया संघाला घरच्या मैदानावर माेठी कसरत करावी लागली. दमछाक झालेल्या ऑस्ट्रेलिया संघाने सामन्यात शुक्रवारी नबीच्या अफगाणिस्तान टीमवर मात केली. मॅथ्यू वेडच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने ४ धावांनी राेमहर्षक विजय संपादन केला. यजमान ऑस्ट्रेलिया संघाला प्रथम फलंदाजी करताना ८ गड्यांच्या माेबदल्यात १६८ धावा काढता आल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघाला ७ गडी गमावत १६४ धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र, यादरम्यान अफगाणिस्तान संघाने शेवटपर्यंत झंुज देत यजमान ऑस्ट्रेलिया संघाचा माेठ्या फरकाने विजय संपादन करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे आता विजयानंतरही ऑस्ट्रेलिया संघाचे भवितव्य एशियन चॅम्पियन श्रीलंकेच्या हातात आहे. कारण, श्रीलंकेच्या शनिवारी इंग्लंडविरुद्ध विजयाने ऑस्ट्रेलियाची आगेकूच निश्चित हाेणार आहे. यातून श्रीलंका संघाचा विजय हा ऑस्ट्रेलियाची दिशा ठरवेल.

सामनावीर मॅक्सवेलच्या थ्राेने अफगाणिस्तानच्या आशा धुळीस नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱ्या सामनावीर ग्लेन मॅक्सवेलचे मैदानावरील क्षेत्ररक्षणही लक्षवेधी ठरले. त्याने याच कामगिरीतून सामन्याला कलाटणी दिली. त्याने शानदार थ्राे मारून नईब व इब्राहिम झारदानच्या माेठ्या भागीदारीला ब्रेक लावला. यातून नईब हा धावबाद झाला. त्यानंतर पुढच्या दाेन षटकांत चार विकेट पडल्या.

पराभव जिव्हारी; नबीने साेडले संघाचे नेतृत्व अफगाणिस्तान संघाचा पराभव जिव्हारी लागल्याने कर्णधार नबीने नेतृत्व साेडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. यातून त्याने संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. नाणेफेक जिंकून नबीने यजमान ऑस्ट्रेलिया टीमला प्रथम फलंदाजीची संधी दिली. गंभीर दुखापत झाल्याने नियमित कर्णधार अॅराेन फिंचला विश्रांती देण्यात आली. यातून संघाच्या नेतृत्वाची धुरा मॅथ्यू वेडकडे साेपवण्यात आली. तसेच टीम डेव्हिडला विश्रांती देण्यात आली. त्याच्या जागी स्मिथला संधी मिळाली. तसेच मिशेल स्टार्कच्या जागी कमॅरून ग्रीनला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बदलासह प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर कॅमरून ग्रीन (३) स्वस्तात बाद झाला. त्याने सलामीवीर डेव्हिड वाॅर्नरसाेबत २२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर वाॅर्नर आणि मार्शने २६ धावांची भागीदारी केली.

बातम्या आणखी आहेत...