आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सलामीवीर म्हणून जबरदस्त कामगिरी करणारा रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा नंतर रोहित कसोटी संघातील महत्त्वातचा खेळाडू आहे. कारण, कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी नंतर मायदेशी परतणार आहे. त्याने म्हटले की, मी यापूर्वी स्पष्ट केले आहे, मी कोणत्याही क्रमावर खेळण्यास तयार आहे. मी संघाच्या गरजेनुसार कुठेही खेळेल. मला माहिती नाही, माझा सलामीवीर म्हणून क्रम बदलला जाईल की नाही. संपूर्ण संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे. विराट परतल्यानंतर पर्याय शोधला असेल आणि सलामीवीर बाबत चर्चा झाली असेल. मी जेव्हा तेथे पोहोचेल, तेव्हाच मला त्याबाबत योग्य माहिती मिळेल. त्याने म्हटले की, ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर अधिक बाउन्स पाहायला मिळतो.
विराट नसल्याने फलंदाजी क्रम दुबळा होईल : चॅपल
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपल यांनी म्हटले की, तीन कसाेटीत कोहली खेळणार नसल्याने टीम इंडियाची फलंदाजी दुबळी होईल. १७ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्यांनी म्हटले, कोहली नसल्याने युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी संधी आहे. कोहलीच्या जागी कोणत्या नव्या खेळाडूंची निवड करणे निवड समितीसाठी आव्हान ठरले असेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.