आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कसोटी मालिका:ऑस्ट्रेलिया दौऱ्यात क्वारंटाइनचा वेळ कमी करणार : सौरव गांगुली

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्हाला न्यायालयाकडून कार्यकाळ वाढवण्याची परवानगी मिळाली नाही तर, आम्ही दुसरे काही तरी करू, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले. लोढा समितीच्या शिफारशीच्या नव्या घटनेनुसार गांगुलीचा कार्यकाळ या महिन्यात समाप्त होत आहे. सचिव जय शहा कार्यकाळ गेल्या महिन्यात आणि संयुक्त जयेश जॉर्जचा पुढील महिन्यात समाप्त होत आहे. आता त्यांना विश्रांती काळात जावे लागेल. मात्र, मंडळाने याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर निर्णय होणे बाकी आहे. त्यांनी म्हटले की, मला अध्यक्ष बनून ७-८ महिने झाले. यातील चार महिने कोविड-१९ मुळे कार्यालयात आम्ही जाऊ शकलो नाही. 

डिसेंबर अखेर ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत गांगुलीने म्हटले, खेळाडूंसाठी १४ दिवसांचे क्वाॅरंटाइन वेळ जास्त वाटतो. त्यांना दोन आठवडे हॉटेलमध्ये रहावे लागेल. त्याला अशा वाटते की, या काळात थोडी सुट मिळेल.ऑस्ट्रेलिया कोरोनाचे ९ हजार रुग्ण आहेत, त्यातील ७५०० पेक्षा अधिक जण बरे झाले. ‘मला आशा वाटते, कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा येथे कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी होईल. मी त्यांच्या संपर्कात आहे. त्यांनी सहा महिन्यांपासून क्रिकेट खेळले नाही,असेही ते म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser