आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Australia Vs Afghanistan World Cup LIVE Score Update; Mitchell Starc Rashid Khan Mitchell Marsh | Marathi News

ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला 4 धावांनी हरवले:राशीद खानने ठोकल्या 23 चेंडूंत 48 धावा, पण विजय अफगाणपासून राहिला दूर

अ‍ॅडलेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टी-20 विश्वचषकाच्या 38 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा अवघ्या 4 धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 168 धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानच्या संघाला 20 षटकांत 7 बाद 164 धावाच करता आल्या. त्यांना अवघ्या 4 धावांनी पराभव पत्करावा लागला.

कांगारूंचा संघाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 54 धावा केल्या. त्याने 32 चेंडूच्या आपल्या डावात 6 चौकार व 2 उत्तुंग षटकार खेचले. तर मिचेल मार्शने 30 चेंडूंत 45 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानतर्फे नवीन उल हकने 3 व फजहलहक फारुकीने 2 बळी घेतले. राशीद खान व मुजीब उर रहमानला प्रत्येकी 1 बळी मिळाला.

अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक धावा राशीद खानने केल्या. त्याने 23 चेंडूंत 48 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. त्याने 3 चौकार व 4 षटकार खेचले. पण त्यानंतरही त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. राशीदचा स्ट्राइक रेट तब्बल 208.69 होता.

डेव्हिड वॉर्नरला आजही मोठी खेळी करता आली नाही आणि तो 18 चेंडूत 25 धावा करून बाद झाला.
डेव्हिड वॉर्नरला आजही मोठी खेळी करता आली नाही आणि तो 18 चेंडूत 25 धावा करून बाद झाला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), उस्मान घनी, इब्राहिम झदरन, गुलबदिन नायब, दरवेश रसुली, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी (कर्णधार), रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी.

ऑस्ट्रेलिया : कॅमेरॉन ग्रीन, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (कर्णधार), पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.

दबावात राहील ऑस्ट्रेलिया
सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाच्या ड्रेसिंग रुममधून आलेल्या बातम्या त्यांच्यासाठी चांगल्या नाहीत. कर्णधार अ‍ॅरॉन फिंच आणि मधल्या फळीतील फलंदाज टीम डेव्हिड जखमी झाले आहेत. हे दोघे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात उतरतील की नाही हे तूर्त तरी ठरलेले नाही. सामन्यापूर्वी दोघांनाही फिटनेस चाचणी द्यावी लागेल.

खरे तर, पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून 89 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ ज्याप्रकारे ओळखला जातो तशी कामगिरी करताना दिसत नाहीये. वॉर्नर, स्मिथ आणि वेडची बॅट शांत आहे. स्टार्क आणि हेझलवूडच्या गोलंदाजीला ती धार दिसली नाही ज्यासाठी ते ओळखले जातात. फक्त मार्क स्टॉइनिस फॉर्मात दिसत आहे.

अफगाणिस्तान आश्चर्यचकित करू शकतो
एकीकडे, एक युनिट म्हणून ऑस्ट्रेलिया फॉर्ममध्ये दिसत नाही. दुसरीकडे, अफगाणिस्तानने या स्पर्धेत एकही सामना जिंकला नसला तरी ऑस्ट्रेलियन संघ यांना हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. याचे कारण म्हणजे या संघाकडे उत्तम गोलंदाजी आक्रमण आहे आणि मोठ्या हिटर्सची फलंदाजी आहे. कागदावर ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसते ही बाब नक्कीच आहे.

राशिद खान, मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी यांच्याकडे कोणत्याही सामन्याचे फासे कधीही उलटण्याची क्षमता आहे. रशीदला गेल्या सामन्यात दुखापत झाली होती. तूर्तास, फिट असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानकडे गमावण्यासारखे काही नाही.

हवामान आणि खेळपट्टी
अ‍ॅडलेडमधून चांगली बातमी येत आहे की, सामना पूर्ण खेळला जाईल आणि पावसाची शक्यता फक्त 10% आहे. वाऱ्याचा वेग ताशी 20 किलोमीटरपेक्षा जास्त असणार नाही.

अ‍ॅडलेडच्या या विकेटवर बाउन्स आणि वेग असेल तर तो फलंदाजांसाठीही योग्य आहे. एकूणच हा सामना उच्च स्कोअरिंग होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फॉर्म दाखवावा लागेल.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया
: डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अ‍ॅश्टन अगर, जोश हेझलवूड.

अफगाणिस्तान : हजरतुल्ला झाझाई, रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, उस्मान घनी, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, फझलहक फारुकी.

बातम्या आणखी आहेत...