आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिगारेट ओढण्याचे संकेत देऊन मागवले लायटर:लॅबुशेनला हेल्मेटच्या कपड्यामुळे फलंदाजीला अडथळा, लायटरने ते पेटवून दूर केले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना बुधवारपासून सिडनी येथे सुरू झाला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान मैदानावर अशी घटना घडली, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

क्रिझवर असलेला फलंदाज मार्नस लॅबुशेनने ड्रेसिंग रुमकडे बघत आधी हेल्मेट आणि नंतर सिगारेट आणि लायटरकडे इशारा केला. मार्नस लॅबुशेनच्या या हावभावानंतर सगळेच चक्रावून गेले.

खरे तर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लॅबुशेनच्या हेल्मेटला कपडा लटकत होता. त्यामुळे लॅबुशेनला फलंदाजीत अडचणी येत होत्या. हे नायलॉनचे कापड जाळण्यासाठी त्याला लायटरची गरज होती. त्याने ड्रेसिंग रूमच्या दिशेने बघितले आणि सिगारेट आणि लायटरकडे इशारा केला.

नंतर मैदानावर खेळाडूने लायटर घेवून गेला आणि त्यानंतर लॅबूशेनने हेल्मेटवर येणाऱ्या कपड्याला जाळून तो अडथळा दूर केला आणि त्यानंतर त्याने पुन्हा फलंदाजी केली.

आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात लॅबुशेनने 79 धावा केल्या होत्या.
आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात लॅबुशेनने 79 धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट लवकर पडली

अवघ्या 12 धावांवर ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट पडली. डेव्हिड वॉर्नर लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि लॅबुशेन यांनी डाव सांभाळला. लबुशेन 79 धावा करून बाद झाला. तर उस्मान ख्वाजा 54 धावा करून खेळत आहे.

बातम्या आणखी आहेत...