आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला विश्वचषक:ऑस्ट्रेलिया संघ सातव्यांदा विश्वविजेता, इंग्लंडला 71 धावांनी हरवले, ऑस्ट्रेलियाने 49 वर्षे आणि 12 सत्रांत सातव्यांदा किताब जिंकला

ख्राइस्टचर्च4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियन महिला संघाने सातव्यांदा विश्वचषक आपल्या नावे केला. ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या अंतिम लढतीत गत चॅम्पियन इंग्लंडला ७१ धावांनी पराभूत केले. सर्वात यशस्वी संघ ऑस्ट्रेलियाने ४९ वर्षे व १२ सत्रांत सातव्यांदा किताब जिंकला. इंग्लंड ४ विजेतेपदांसह दुसऱ्या स्थानी आहे. प्रथम खेळताना ऑस्ट्रेलियाने ५ बाद ३५६ धावांचा डोंगर उभारला. एलिसा हिलीने (१७०) नाबाद शतकी खेळी केली. तिचे विश्वचषकातील दुसरे शतक ठरले. इंग्लंड संघ ४३.३ षटकांत २८५ धावांवर ढेपाळला. नताली सीव्हरने (१४८*) शतक केले. तिचे यंदाच्या विश्वचषकातील दुसरे शतक आहे.

हिली यंदाच्या विश्वचषकात ५००+ धावा करणारी एकमेव खेळाडू बनली
खेळाडू देश लढत धावा 100/50
एलिसा हिली ऑस्ट्रेलिया 9 509 2/2
राचेल हेन्स ऑस्ट्रेलिया 9 497 1/3
नताली सिव्हर इंग्लंड 9 436 2/1

सोफी 20+ बळी घेणारी एकमेव खेळाडू सोफी अॅक्लेस्टोन इंग्लंड 9 21 12 शबनीम इस्माईल द. आफ्रिका 8 14 5 जेस जोनासन ऑस्ट्रेलिया 8 13 4

विश्वचषक २०२२ चे वैशिष्ट्ये
*हिलीने पुरुष व महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम रचला. तिने अॅडम गिलख्रिस्टचा (१४९ धावा, विश्वचषक २००७) विक्रम मोडला.
* ऑस्ट्रेलियन महिला संघाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ५ बाद ३५६ धावांचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम बनला. हा पुरुष-महिला विश्वचषकातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलियन पुरुष संघ आहे, त्यांनी २००३ मध्ये भारताविरुद्ध २ बाद ३५९ धावा केल्या होत्या.
*मेग लेनिंगने किताब जिंकण्याच्या बाबतीत रिकी पाँटिंगची बराेबरी साधली. लेनिंगने ३ टी-२० विश्वचषक व एक वनडे ट्रॉफी जिंकली, तर पाँटिंगने २ वनडे व दोन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
*ऑस्ट्रेलियन महिला संघ सर्वाधिक ९ वेळा विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला, ७ वेळा किताब आपल्या नावे केला. इंग्लंड संघ आठव्यांदा फायनलमध्ये पाेहोचला, ४ वेळा चॅम्पियन बनला.
*आॅस्ट्रेलियाने यंदाच्या विश्वचषकात सर्व ९ सामने जिंकले, अशी कामगिरी करणारा एकमेव संघ बनला. दक्षिण आफ्रिका ५ विजयासह दुसऱ्या स्थानी आहे.

बातम्या आणखी आहेत...