आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Australian Cricketers On The Same Day Against The Same Country's Team, Starc Elisa Couple's Unprecedented Match|Marathi News

फॅमिली ऑन ग्राउंड:ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एकाच दिवशी एकाच देशाच्या संघाविरुद्ध मैदानावर, स्टार्क-एलिसा दांपत्याचा अपूर्व याेगायाेग

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलामीवीर एलिसा हिलीचे १४ वे अर्धशतक; पाकविरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचा १३ वा विजय
ऑस्ट्रेलियन संघाकडून एलिसा हिलीची कामगिरी काैतुकास्पद ठरली. तिने सलामीवीरच्या भूमिकेत ७२ धावांची खेळी केली. तिने १४ वे अर्धशतक साजरे केले. ऑस्ट्रेलिया संघाने ३४.४ षटकांत तीन गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १९० धावा काढल्या होत्या. यातून ऑस्ट्रेलियन महिला संघाने विश्वचषकात पाकवर पाचवा विजय नाेंदवला. तसेच ऑस्ट्रेलियाने आपली माेहीम कायम ठेवताना पाकवर सलग १३ वा विजय संपादन केला. या लढतीत सर्वाेत्तम खेळी करणारी एलिसा हिली ही सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.

फलंदाजीसाठी पाेषक ठरली खेळपट्टीवर; ११८७ धावांची नाेंद; गाेलंदाजांकडून १४ विकेट
ऑस्ट्रेलिया संघाची मंगळवारी पाकविरुद्धची सलामी कसाेटी अनिर्णित राहिली. या दाेन्ही संघांत आतापर्यंत १९ कसाेटी सामने ड्राॅ झाले आहेत. आता ऑस्ट्रेलियन संघाचा मिशेल स्टार्क सलामीच्या कसाेटीत फ्लाॅप ठरला. त्याला गाेलंदाजी आणि फलंदाजीमध्ये समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्याने फलंदाजीत फक्त १३ धावा काढल्या. तसेच गाेलंदाजीत त्याने ७ षटकांत २९ धावा दिल्या. मात्र, त्याचा बळी घेण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवशी ७ बाद ४४९ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. टीमचा पहिला डाव ४५९ धावांत गुंडाळला गेला. पाकने दुसऱ्या डावात बिनबाद २५२ धावा काढल्या. येत्या १२ मार्चपासून दाेन्ही संघातील दुसऱ्या कसाेटीला सुरुवात होणार आहे.

मिशेल स्टार्क ठरला गाेलंदाजी-फलंदाजीमध्ये अपयशी; ऑस्ट्रेलिया-पाक १९ व्यांदा कसाेटी ड्राॅ
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एक वेगळ्या प्रकारचा लक्षवेधी असा याेग जुळून आला आहे. पती आणि पत्नी दाेघेही एकाच दिवशी एकाच देशाच्या संघांविरुद्ध मैदानावर उतरले. त्यामुळे मंगळवारी घडून आलेला हा याेगायाेग ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील मिशेल स्टार्क आणि एलिसा हिलीने घडवून आणला. ऑस्ट्रेलिया संघातील हे दाेघेही पाकिस्तानच्या संघाविरुद्ध खेळले. यात मिशेल स्टार्कने रावळपिंडीत यजमान पाकविरुद्ध सलामीच्या कसाेटीत सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...