आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसाेटी:ऑस्ट्रेलियाच्या स्मिथने साधली ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बराेबरी

पर्थ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान ऑस्ट्रेलिया संघाने घरच्या मैदानावर विंडीजविरुद्ध सलामीच्या कसाेटीतील पहिल्या डावात धावांचा डाेंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाने ४ गड्यांच्या माेबदल्यात ५९८ धावा काढून आपला पहिला डाव घाेषित केला. दरम्यान, स्मिथने घरच्या मैदानावर नाबाद २०० आणि लबुशेनने २०४ धावांची खेळी केली. या द्विशतकी खेळीने यजमान ऑस्ट्रेलिया संघाच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. प्रत्युत्तरात विंडीज संघाने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात बिनबाद ७४ धावा काढल्या. टीमकडून कसाेटीत पदार्पण करणारा तेगनारायण (नाबाद ४७) आणि कर्णधार ब्रेथवेट (नाबाद १८) मैदानावर कायम आहेत.

ऑस्ट्रेलिया संघाच्या स्मिथने करिअरमध्ये २९ वे कसाेटी शतक साजरे केले. यासह त्याने प्रसिद्ध क्रिकेटपटू ब्रॅडमन यांच्या विक्रमी शतकांशी बराेबरी साधली. तसेच त्याने कसाेटीत घरच्या मैदानावर ४ हजार धावांचाही पल्ला गाठला. तसेच ट्रेव्हिस हेडचा (९९) शतक साजरे करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. ताे बाद झाल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्सने आपल्या टीमचा पहिला डाव घाेषित करण्याचा निर्णय जाहीर केला. विंडीज संघाकडून ब्रेथवेटने सर्वाधिक २, अल्जारी जाेसेफ आणि जायडेनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

बातम्या आणखी आहेत...