आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Pakistan Vs England T20 Series, Babar Rizwan Create New T 20 World Record: First Opening Pair To Score 200+ Runs

बाबर-रिझवानने रचला नवा T-20 वर्ल्ड रेकॉर्ड:200+ धावांची भागीदारी करणारी पहिली ओपनिंग जोडी, मोडला स्वत:चाच रेकॉर्ड

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. या जोडीने इंटरनॅशनल T-20 मध्ये धावसंख्येचा पाठलाग करताना सर्वात मोठी भागीदारी केली आहे. दोघांमध्ये 117 चेंडूत 203 धावांची सलामी भागीदारी झाली. या भागीदारीच्या जोरावर जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या टीम पाकिस्तानने इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला.

यासह पाकिस्तानने 7 टी-20 सामन्यांच्या सिरिजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सिरिजचा तिसरा सामना आज कराची स्टेडियमवर होणार आहे.

इंग्लंड-पाकिस्तान सामन्यात हा रेकॉर्डपण झाला होता.

सर्वाधिक शतके करणारा कर्णधार: बाबर आझम कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत संयुक्तरित्या क्रमांक-1 वर आहे. हे त्याचे दुसरे टी-20 शतक आहे. बाबरने भारतीय कर्णधार रोहित शर्माची बरोबरी केली आहे. रोहितच्या नावावर कर्णधार म्हणून टी-20 मध्ये 2 शतके आहेत.

पाकिस्तानसाठी सर्वात मोठी सलामीची भागीदारी: बाबर-रिझवान यांनी 203 धावांची नाबाद भागीदारी केली. टी-20 इंटरनॅशनल सामन्यांमध्ये पाकिस्तानसाठी ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे. दोघांनी स्वतःचाच विक्रम मोडला. या दोघांनी एप्रिल 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये पहिल्या विकेटसाठी 197 धावांची भागीदारी केली होती. दोघांनी 5व्यांदा 150 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी केली आहे

कर्णधार म्हणून बाबरचे 10 वे शतक: बाबरने पाकिस्तानचा कर्णधार म्हणून इंटरनॅशनल क्रिकेटमधील 10 वे शतक झळकावले. त्याचे हे इंटरनॅशनल क्रिकेटमधील 26 वे शतक होते. बाबरने माजी कर्णधार इंझमाम-उल-हकचा विक्रम मोडला.

सामन्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या…

इंग्लंडने पहिल्यांदा खेळताना 199/5 धावांचा आकडा गाठला. मोईन अलीने त्यांच्याकडून सर्वाधिक नाबाद 55 धावा केल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करताना टीम पाकिस्तानने 19.3 षटकांतच 203 धावा करत विजय मिळवला. रिझवान आणि बाबरने मोठी भागीदारी करत सामना जिंकला. एकही विकेट न गमावता करता 200+ धावा करणारा पाकिस्तान पहिला संघ ठरला आहे.

पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने 110 आणि मोहम्मद रिझवानने 88 धावा केल्या. दोघांमध्ये 117 चेंडूत 203 धावांची सलामी भागीदारी झाली. धावसंख्येचा पाठलाग करताना ही सर्वात मोठी भागीदारी आहे. बाबर-रिजवानने यापूर्वीचा स्वतःचाच साउथ आफ्रिके विरूद्धचा 197 धावांचा रेकॉर्ड मोडला आहे.

गोलंदाजीमध्ये पाकिस्तानकडून हरिस राउफ आणि शाहनवाज दहानी यांनी 2-2 बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...