आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Babar Used To Practice De Villiers' Shots In His Dreams: Where He Was A Ball Picker, 14 Years Later Captained On The Same Ground

बाबर स्वप्नात डिव्हिलियर्सच्या शॉटचा सराव करायचा:जिथे तो बॉल पिकर होता, 14 वर्षांनंतर त्याच मैदानावर झाला कर्णधार

लेखक: शहीद हाशमी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबर 2007 ची गोष्ट आहे, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघ लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर आमनेसामने होते. सीमारेषेच्या बाहेर चेंडू येताच एक 13 वर्षांचा मुलगा त्या दिशेने धावत जावून सर्वात आधी तो चेंडू पकडायचा. .

त्याच्यात प्रचंड उत्साह आणि जोश होता. घरी परतल्यानंतर त्या मुलाला रात्री झोप येत नसत. तो रात्रभर मोहम्मद युसूफ आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्सला खेळतानाचे स्वप्न पाहायचा. त्यावेळी हा मूलगा कोण आहे हे कोणालाच माहीत नव्हते.

14 वर्षांनंतर म्हणजेच फेब्रुवारी 2021 मध्ये तेच गद्दाफी स्टेडियम. पुन्हा एकदा पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने, पण यावेळी तो मुलगा सीमारेषेच्या बाहेर नव्हता, तर स्लिपमध्ये उभेा होता आणि फिल्डिंग सजवत होता, पाकिस्तान संघाचे नेतृत्व करत होता त्या मुलाची आता म्हणजे बाबर आझमची, आज एक वेगवान, सामना जिंकणारा आणि जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक म्हणून त्याची ओळख झाली आहे.

आज त्याच बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ विश्वचषकाचा अंतिम सामना खेळत आहे.

बाबरचे बालपणीचे चित्र. धाकट्या भावासोबत डावीकडे उभा आहे
बाबरचे बालपणीचे चित्र. धाकट्या भावासोबत डावीकडे उभा आहे

आतापर्यंतच्या सात वर्षांच्या कारकिर्दीत बाबरने प्रत्येक फॉरमॅटमध्ये शानदार खेळी खेळली आहे. आपल्या कामगिरीने त्याने जगातील आघाडीच्या विश्लेषक आणि समालोचकांना फॅब फोर पासून फॅब फाइव्ह अशी टीम बनवण्यास भाग पाडले आहे. स्टीव्ह स्मिथसह विराट कोहली, केन विल्यमसन आणि जो रूट यांच्यासोबत आपलेही नाव जोडले आहे.

सध्या बाबर जगातील नंबर वन वनडे खेळाडू आहे. कसोटीत तिसरा आणि टी-20 मध्ये चौथा. त्याची कसोटीत 43, एकदिवसीय सामन्यात 56.8 आणि T20 मध्ये 47.32 ही त्याची सरासरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पराक्रम सांगण्यासाठी पुरेशी आहे.

आता बाबरच्या कथेकडे वळू. लाहोरचा राहणारा बाबर लहानपणी वडिलांसोबत गद्दाफी स्टेडियमचे सामने पाहण्यासाठी जायचा. हळूहळू त्याची क्रिकेटमध्ये आवड वाढू लागली. एकदा बाबरने जेपी ड्युमिनीचा षटकार मारलेला चेंडू बाऊंड्रीबाहेर झेलला होता. तेव्हा समालोचकांनी सुद्धा त्यांचे कौतुक केले.

वडील आझम सिद्दिकी यांना आतापर्यंत समजून चुकले होते की आपल्या मुलाला क्रिकेटमध्ये रस आहे. त्यांनी बाबरला मुस्लीम मॉडेल स्कूलमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले. मोहम्मद युनूस हे येथील प्रशिक्षक होते. मुले त्याला मामा जुना म्हणत. मोहम्मद युनूसने सलीम मलिक, नासिर जमशेद या खेळाडूंनाही प्रशिक्षण दिले.

युनूसने पहिल्याच दिवशी बाबरला धडा दिला. तो धडा होता - नेटवर सर्वात आधी जायचे आणि सर्वात शेवटी बाहेर पडायचे. बाबरनेही त्याचे अनुकरण केले. तो प्रथम 7-8 किमी चालत क्लबला सर्वात आधी जायचा, तिथे नेट प्रॅक्टिस करायचा आणि सर्वात शेवटी बाहेर पडायचा.

यानंतर बाबरला नवा मंत्र मिळाला - पहिला चेंडूपण तूच खेळायचा आणि शेवटचा चेंडूही. म्हणजे विकेट द्यायचा नाही

बाबर आझम वडील आझम सिद्दीकीसोबत. वडिलांसोबत दुचाकीवर बसून सरावासाठी जात असे.
बाबर आझम वडील आझम सिद्दीकीसोबत. वडिलांसोबत दुचाकीवर बसून सरावासाठी जात असे.
हे त्या दिवसांचे चित्र आहे जेव्हा बाबर आझम मुस्लिम मॉडेल स्कूलमध्ये क्रिकेटचे कोचिंग घेत होता.
हे त्या दिवसांचे चित्र आहे जेव्हा बाबर आझम मुस्लिम मॉडेल स्कूलमध्ये क्रिकेटचे कोचिंग घेत होता.

आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देताना बाबर सांगतो, “पापा माझे खेळ पाहण्यासाठी क्लबमध्ये यायचे. अनेकवेळा ते मला कळू न देता गुपचूप मैदानावरही यायचे. घरी परतल्यावर जेव्हा मी त्यांना सांगायचे की आज मी असा खेळलो, असा शॉट मारला, तेव्हा ते माझे खोटे बोललेले पकडायचे आणि मला रागवायचे. खेळताना मी मैदानात इकडे तिकडे पाहत राहायचो की पापा इथे हजर आहेत का. तर कधी कधी पप्पा मैदानाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात शांतपणे उभे असलेले दिसायचे.

यानंतर बाबरची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी (NCA) निवड झाली. एनसीए म्हणजे पाकिस्तानच्या तरुण क्रिकेटपटूंची नर्सरी. एके दिवशी पाकिस्तानचे माजी सलामीवीर आणि प्रशिक्षक मुदस्सर नजर यांची नजर बाबरवर पडली. तो बाबरला म्हणाला- 'बेटा, बॅटिंगकडे लक्ष दे'. यानंतर बाबरने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

बाबर आझम त्याच्या कुटुंबासह. बाबरचे वडील लाहोरमध्ये घड्याळ दुरुस्तीचे दुकान चालवायचे.
बाबर आझम त्याच्या कुटुंबासह. बाबरचे वडील लाहोरमध्ये घड्याळ दुरुस्तीचे दुकान चालवायचे.

त्या दिवसांची आठवण करून देत बाबर सांगतो, 'एक दिवस मुदस्सर सरांनी शोएब अख्तरला सरावासाठी बोलावले आणि मला त्याचा चेंडू खेळायला सांगितले. मला पाहून शोएबला आश्चर्य वाटले, पण त्याने मला प्रोत्साहन दिले. तो म्हणाला, 'बेटा, तुला चेंडूला डिफेंड करायचे आहे, मी चेंडू पार उंचावरून टाकेन.

बाबर म्हणतो, 'दोन ते तीन वेळा मी डेड शॉट खेळला, पण त्यानंतर मला अशा चेंडूचा सामना कसा करायचा हे समजले आणि पुढचा चेंडूवर शॉट मारला. शोएब थोडा हैरान झाला आणि पुढचा चेंडू बाउन्सर टाकला. मी त्याला डकवले. दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या मुदस्सर सरांनी मला हाक मारली आणि म्हणाले की घाबरू नकोस, सामोरे जा. यानंतर शोएब जेव्हा जेव्हा मैदानावर यायचा तेव्हा मी त्याचा सामना करायचा. एका प्रसंगी त्याने असा बाऊन्सर फेकला जो माझ्या डोक्याला लागणार होता तो थोडक्यात बचावला.

2020 मध्ये शोएब अख्तरने बाबर आझमबद्दल एक ट्विट केले होते. त्यांनी लिहिले, 'तेव्हाही तितकाच प्रतिभावान होता आणि आजही आहे.'

मे 2008 मध्ये, पाकिस्तान अंडर-15 क्रिकेट संघ क्लिको कप खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला गेली होती. वेस्ट इंडिजने फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला, पण 8 सामन्यात 436 धावा करणारा बाबर टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. या मालिकेत बाबरने 1 शतक आणि चार अर्धशतके झळकावली. यामुळे त्याच्या प्रशिक्षकाला खूप आनंद झाला.

मुदस्सरने 2009 मध्ये सांगितले होते की, 'आम्हाला वाटत होते की बाबरने त्याच्या खेळात हळूहळू सुधारणा करावी. बाबरबरोबर आम्ही कधीही घाई केली नाही. बाबर हा NCA चे खरा विदयार्थी आहे. जर तुम्ही बाबरला एकदा सांगितले की तु हे चूक करत आहेस, तर तो त्यावर तासनतास सराव करेल आणि पुन्हा ती चूक कधीही करणार नाही.'

यानंतर बाबरची 19 वर्षांखालील संघात निवड झाली. 2009-10 ची गोष्ट आहे, 'पाकिस्तानचा अंडर 19 संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यात बाबरला 5 सामन्यात केवळ 41 धावा करता आल्या होत्या. असे असूनही, निवडकर्त्यांनी 2010 च्या ICC ज्युनियर विश्वचषकासाठी त्याची निवड केली. त्या मालिकेत बाबरने 6 सामन्यात 59.60 च्या सरासरीने 298 धावा केल्या. त्यात एक शतक आणि अर्धशतकही होते.

2012 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या ज्युनियर वर्ल्ड कपसाठी बाबरला पाकिस्तानचा कर्णधार बनवण्यात आले होते. बाबरने या मालिकेत 57.40 च्या सरासरीने 287 धावा केल्या. ज्यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. या मालिकेनंतरच बाबरकडे पाकिस्तानचा भावी खेळाडू म्हणून पाहिले जात होते. अनेक जण त्याला पाकिस्तानचा भावी कर्णधार सुद्धा म्हणू लागले होते.

हे चित्र 2012 अंडर 19 आशिया कपचे आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना बरोबरीत सुटला होता. आझम त्यावेळी पाकिस्तान अंडर-19 संघाचा कर्णधार होता.
हे चित्र 2012 अंडर 19 आशिया कपचे आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना बरोबरीत सुटला होता. आझम त्यावेळी पाकिस्तान अंडर-19 संघाचा कर्णधार होता.

2014-15 हंगामात, बाबरने कायदे-ए-आझम सिल्व्हर लीगमध्ये 429 धावा आणि अंतिम सामन्यात 266 धावा केल्या. यानंतर बाबरने राष्ट्रपती गोल्ड कप मालिकेत 7 सामन्यात 484 धावा केल्या. 97.40 ची सरासरी आणि तीन शतके.

बाबरने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. झिम्बाब्वे समोर होता, त्यावेळी बाबरने 60 चेंडूत 54 धावा केल्या. बाबरने पहिल्या 15 वनडे सामन्यांमध्ये पाच अर्धशतके झळकावली आणि येथूनच बाबरच्या फलंदाजीला वेग आला.

2016 मध्ये बाबरने वेस्ट इंडिजविरुद्ध सलग तीन शतके झळकावली होती. त्यानंतर याच वर्षी एडिडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्ससारख्या आक्रमणांसमोर शतक झळकावले. यानंतर बाबरच्या नावावर अनेक मोठे रेकॉर्ड जमा झाले.

2000 वनडे धावा करणारा दुसरा सर्वात वेगवान खेळाडू. सर्वात जलद 1000 T-20 धावा करणारा दुसरा आणि चार डावात सर्वात जलद 2000 T-20 धावा करून विराट कोहलीचा विक्रम मोडला.

मात्र, बाबरला सुरुवातीच्या दिवसांत कसोटी फॉरमॅटमध्ये विशेष काही करता आले नाही. त्याला स्पिनर्स समोर खेळताना खूप अडचणींचा सामना करावा लागला. बाबरने 2018 मध्ये 17 व्या सामन्यात पहिले कसोटी शतक झळकावले. यानंतर मागे वळून पाहिले नाही. बाबरने आतापर्यंत 7 कसोटी शतके झळकावली आहेत.

बाबरने 2016 मध्ये पहिला टी-20 खेळला होता. सुरुवातीला त्याची कामगिरी चांगली नव्हती. तो संथ खेळतो आणि डॉट बॉल जास्त खेळतो, अशी टीकाही त्याच्यावर झाली. बाबरने 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 103 धावांची इनिंग खेळली आणि संघाला विजय मिळवून दिला. हे त्याचे पहिले टी-20 शतक होते. बाबरने आतापर्यंत टी-20 मध्ये दोन शतके झळकावली आहेत.

विराट कोहली चांगला खेळतो, म्हणून एकदा बाबर आझमचा खेळ पहा - टॉम मूडी

सुरुवातीच्या काळात अनेक क्रिकेटपटू बाबरची तुलना विराट कोहलीसोबत करू लागले. याबाबत बाबर 2019 मध्ये म्हणाला होता, 'सध्या मी कोहलीच्या खूप मागे आहे. तो सामना जिंकणारा खेळाडू आहे. मी त्याला दोन वेळा भेटलो आहे आणि माझ्या कमकुवतपणाबद्दल बोललो आहे. मी कोहलीला वेगवेगळ्या परिस्थितीत फलंदाजी करताना पाहतो आणि त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो.

बाबर म्हणतो की कोहलीशी तुलना करणे चांगले आहे. तो खूप चांगला खेळाडू आहे आणि तो मैदानावर त्याचे 100 टक्के देतो. मी अजूनही माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, त्यामुळे विराटसारखे बनावे आणि माझ्या संघाला विजय मिळवून द्यावे.

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी गेल्या वर्षी म्हणाला होता, "जर तुम्हाला विराट कोहली चांगला वाटत असेल तर बाबर आझमला खेळताना पहा."

कोहली बाबरपेक्षा खूप पुढे असला तरी. कोहलीने धावांचा पाठलाग करताना 43 वनडे शतकांपैकी 26 शतके धावांचा पाठलाग करून ठोकली आहेत. ज्यामध्ये भारताने 22 सामने जिंकली आहेत आणि कोहली 17 मध्ये सामनावीर ठरला आहे. तर बाबरला लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ 4 शतके झळकावता आली. यापैकी केवळ दोनमध्ये तो पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकला आहे.

बाबरचे कोहलीशीही चांगले संबंध आहेत. गेल्या वर्षीच्या T-20 विश्वाचषकातील गोष्ट आहे. पाकिस्तानने भारतावर 10 विकेट्सने मात केली. यानंतर बाबर कोहलीसोबत बोलत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये दोघे हसताना दिसले होते. या फोटोने सोशल मीडियावर बरीच हेडलाइन्स बनवली आहेत.

या वर्षी जुलैमध्ये, जेव्हा कोहली खराब फॉर्मशी झुंजत होता, तेव्हाही बाबरने ट्विट केले होते की ही वेळ देखील निघून जाईल, मजबूत रहा. यावर्षीही दुबईत आशिया कप स्पर्धेपूर्वी कोहली आणि बाबरने हस्तांदोलन केले.

नेटमध्ये अधिक चांगले कसे खेळायचे हे कोहलीकडून शिकलो: बाबर

बाबर सांगतो, 'सुरुवातीला मला नेटवर जास्त वेळ घालवता येत नसे. कधी कधी मी फार लवकर आउट व्हायचो. त्यामुळे माझा संपूर्ण दिवस खराब जायचा. त्यानंतर मी नेट प्रॅक्टिसवर लक्ष केंद्रित करणे बंद केले. त्याचा परिणाम माझ्या खेळावर दिसू लागला. एकदा मी कोहलीला विचारले की जर मी तीन-चार वेळा नेटमध्ये आऊट झालो किंवा मला तिथे बॉल नीट खेळता येत नसेल तर काय करावे?

तेव्हा कोहली मला म्हणाला की, तू नेटमध्ये खेळतोस, तुला जे वाटतं तेच तुझ्यासोबत घडते, मॅचमध्येही असेच घडतं. या संवादाची मला खूप मदत झाली.

बाबर म्हणतो, 'मला एबी डिव्हिलियर्सचा कव्हर ड्राईव्ह खूप आवडायचा. मी ते पहायचो आणि रोज सिमेंटच्या पिचवर कॉपी करण्याचा प्रयत्न करायचो. सुरुवातीला मी आत्मविश्वासाने कव्हर ड्राइव्ह मारू शकलो नाही. सीनियर्स म्हणायचे की हा नाद सोड, पण त्याला जी गोष्ट आवडली आहे त्याने ती कशी सोडावी. मी प्रयत्न करत राहिलो आणि हळूहळू मी उत्तम कव्हर ड्राइव्ह मारायला सुरुवात केली.

पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांचाही बाबरला सुधारण्यात मोलाचा वाटा आहे. त्यांनी बाबरला तांत्रीक बाजू शिकवले आणि प्रोत्साहनही दिले. कोणत्याही किंमतीत तुझी विकेट जाऊ देऊ नकोस, असे ते अनेकदा बाबरला सांगत असे. प्रत्येक चेंडू काळजीपूर्वक खेळत जा. मिकीने एकदा सांगितले की बाबर आझम त्याच्या मुलासारखा आहे.

या वर्षी ऑगस्टमध्ये आशिया कप दरम्यान बाबर आझमशी हस्तांदोलन करताना विराट कोहली. या फोटोने सोशल मीडियावर बरीच हेडलाइन्स बनवली आहेत. यावर लोकांनी अनेक मीम्स शेअर केले.
या वर्षी ऑगस्टमध्ये आशिया कप दरम्यान बाबर आझमशी हस्तांदोलन करताना विराट कोहली. या फोटोने सोशल मीडियावर बरीच हेडलाइन्स बनवली आहेत. यावर लोकांनी अनेक मीम्स शेअर केले.

लाइन लेन्थ लवकर ओळखणे आणि उशिरा खेळणे ही बाबरची ताकद आहे

एवढेच नाही तर पाकिस्तानचे फलंदाजी प्रशिक्षक असलेले ग्रँट फ्लॉवरही बाबरचे चाहते आहेत.

गेल्या वर्षी ग्रँट फ्लॉवर म्हणाला होता - 'जेव्हा मी बाबरला पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्याच्याकडे चेंडू फेकला होता. माझ्या लक्षात आले की त्याला बॉलची लाईन लेन्थ खूप लवकर कळते आणि उशीरा खेळतो. म्हणजेच, त्याच्या डोळ्यांचा त्याच्या हातांचा समन्वय चांगला आहे. हेच मोठ्या खेळाडूचे लक्षण आहे. स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहलीही हेच तंत्र अवलंबतात. मला वाटते की तो लवकरच अनेक विक्रम मोडेल.

ऑक्टोबर 2019 आहे. सरफराजला काढून टाकल्यानंतर पाकिस्तानने तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद बाबर आझमकडे सोपवले. त्यावेळी बाबर कर्णधारपदाचे दडपण सहन करू शकणार नाही, अशी चर्चा रंगली. मात्र, बाबरला कर्णधारपद मिळून जास्त काळ झालेला नाही. त्यामुळे यावर काहीही बोलणे जरा घाईचे असले तरी त्याची सुरुवात चांगली झाली आहे. बाबरची फलंदाजी आणि शिस्तही त्याच्या कर्णधारपदावरून दिसून येते.

वनडे कर्णधार झाल्यानंतर बाबरने दोन शतके झळकावली. यामध्ये त्यांचा संघ झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत झाला. क्रीजवर असूनही त्याला तो खेळ पूर्ण करता आला नाही. लवकरच त्याने ही उणीवही दूर केली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ शतकच केले नाही तर संघाला विजयापर्यंत नेले.

त्याचे प्रशिक्षक मुदस्सर म्हणतात, “पाकिस्तानला बाबरमध्ये एक नवा क्रिकेटचा हिरो सापडला आहे. ज्याला देशासाठी अजून खूप काही साध्य करायचे आहे. तो एक दिवस नक्कीच महान खेळाडू बनेल, पण ते एका रात्रीत होणार नाही. त्याला थोडा वेळ लागेल.

बातम्या आणखी आहेत...