आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकदिवसीय क्रिकेट सामना:आज बांगलादेश-भारत दुसरा वनडे सामना रंगणार

मीरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलामीच्या विजयाने फाॅर्मात असलेला यजमान बांगलादेश संघ आता आपल्या घरच्या मैदानावर टीम इंडियाविरुद्ध वनडे मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. यजमान बांगलादेश आणि भारत यांच्यात आज बुधवारी मीरपूरच्या मैदानावर दुसरा वनडे सामना हाेणार आहे. विजयी सलामी देत बांगलादेश संघाने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. त्यामुळे आता टीम इंडियासाठी मीरपूरच्या मैदानावरील दुसरा वनडे हा निर्णायक आहे. सलामीच्या सामन्यातील सुमार खेळीनंतर राेहित शर्माच्या टीम इंडियावर मालिका पराभवाचे सावट आहे. टीमला सुमार फलंदाजीने टीमला सलामीला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. विजयाने बांगलादेशला घरच्या मैदानावर सलग सातव्या वनडे मालिका विजयाची नाेंद करता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...