आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 वर्ल्डकप:बांगलादेशला नमवले, पावसानंतर भारताचा विजय

अॅडिलेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा ५ धावांनी पराभव करून उपांत्य फेरीचा मार्ग सुकर केला. ४ सामन्यांत ६ गुणांसह टीम इंडिया ग्रुप-२ मध्ये टॉपवर असून पॉइंट्सच्या बाबतीतह सर्व १२ संघांमध्ये टॉपवर आहे. रविवारी भारताचा (६ नोव्हेंबर) झिम्बाब्वेसोबत सामना आहे. तथापि, राहुल (३२ चेंडूंत ५० धावा) व कोहलीच्या (४४ चेंडूंत ६४ धावा) फलंदाजीमुळे भारताने बांगलादेशसमोर १८४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, बांगलादेश ७ षटके खेळल्यानंतर पाऊस सुरू झाला. डकवर्थ लुइस नियमांतर्गत त्यांना १६ षटकांत १५१ धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, त्यांचा संघ ६ गडी गमावत १४५ धावाच करू शकला. हार्दिक, अर्शदीपने २-२ गडी बाद केले.

ग्रुप-२ मध्ये टॉप; उपांत्य सामन्यापासून एक पाऊल दूर पाऊस, रनआऊटने बदलला ‘खेळ’; पावसाआधी विरोधी संघाने ७ षटकांत एकही गडी न गमावता ६६ धावा केल्या. मात्र, ८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राहुलने लिटनला धावबाद केल्याने सामन्याला कलाटणी मिळाली.

शेवटच्या षटकातील थरार... अर्शदीपच्या षटकात २० रन हवे होते, पण १४ निघाले बॉल रन 1 1 रन 2 6 रन 3 0 रन 4 2 रन 5 4 रन 6 1 रन

हा विक्रमही बनला: कोहली टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक १०६५ धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने या वर्ल्डकपमध्ये तिसरे अर्धशतक केले.

पुढील सामन्यासाठी समीकरण... {झिम्बाब्वेसोबतचा सामना हरल्यास नेट रनरेटच्या भरवशावर राहावे लागेल. म्हणजे आशा कायम. {झिम्बाब्वे जिंकला तरीही ५ गुण होतील. म्हणजे उपांत्य फेरीची आशा जवळपास संपुष्टात. {ग्रुप-२ मध्ये भारत, बांगलादेश, झिम्बाब्वे, नेदरलँड्सचे ४-४ सामने झाले आहेत. १-१ बाकी आहे. नेदरलँड्स आधीच बाहेर झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...