आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण आफ्रिकेने पहिली कसोटी जिंकली:बांगलादेश दुसऱ्या डावात अवघ्या 53 धावांत पव्हेलियनमध्ये, केशव महाराजने घेतले 7 बळी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 220 धावांनी पराभव केला. विजयासाठी 274 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ सामन्याच्या शेवटच्या दिवशी 53 धावांवर गारद झाला होता.

सोमवारी किंग्समीडच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज केशव महाराजची जादू पाहायला मिळाली. त्याने आपल्या फिरकी गोलंदाजीने बांगलादेशी फलंदाजांना गोंधळात टाकले. त्याने अवघ्या 32 धावा खर्च करत पाहुण्या संघाच्या सात फलंदाजांना आउट केले. तो दक्षिण आफ्रिकेकडून एका डावात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.

9 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत
सामन्याच्या शेवटच्या दिवशी बांगलादेशचा डाव अवघ्या तासाभरात आटोपला होता. संघाच्या नऊ फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही. केवळ नजमुल हसन (26 धावा) आणि तस्किन अहमद (14) दुहेरी आकड्यात धावा करू शकले. केशव महाराजशिवाय सायमन हार्मरने तीन बळी घेतले. बांगलादेशच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही.

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 204 धावा केल्या
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 204 धावा करत 274 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार डीन एल्गरने (64) अर्धशतक झळकावले. कीगन पीटरसनने 36 आणि रायनने नाबाद 39 धावांचे योगदान दिले. बांगलादेशने पहिल्या डावात 298 आणि दक्षिण आफ्रिकेने 367 धावा केल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...