आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आयपीएल 2020:सरकारच्या परवानगीशिवाय बीसीसीआयची यूएईमध्ये आयपीएलआयाेजनाची घाेषणा; २ ऑगस्ट रोजी गव्हर्निंग काैन्सिलची बैठक

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बैठकीत हाेणार वेळापत्रक व परवानगीवर सखाेल चर्चा

आयपीएल गव्हर्निंग काैन्सिलची बैठक २ ऑगस्ट रोजी होत आहे. बैठकीत यूएईमध्ये होणाऱ्या लीगचे वेळापत्रक निश्चित केले जाईल. आयपीएल अध्यक्ष ब्रिजेशा पटेलने बैठकीच्या तारखेला दुजोरा दिला. मात्र, अद्याप भारत सरकारकडून स्पर्धेचे यूएईमध्ये आयोजन करण्याबाबत कोणतीही परवानगी मिळाली नाही. लीग १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान चालेल. ५१ दिवसांत ६० सामने खेळवले जातील. मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, बैठकीत सर्व ८ फ्रेंचायझींना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) बाबत माहिती दिली जाईल. बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा सहभागी हाेतील. गांगुली व शहांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. लीगचे सर्व सामने रिकाम्या स्टेडियममध्ये व बायो सुरक्षित वातावरणात होतील.

कठोर नियम बनवायला हवे, ईसीबी त्यामुळे यशस्वी

स्पर्धेला चांगल्या प्रकारे आयोजित करण्यासाठी काैन्सिलला कठोर नियम बनवावे लागेल. एका खेळाडूंच्या चुकीमुळे संपूर्ण स्पर्धेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाकडून शिकायला हवे. विंडीज विरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान केवळ २८० जणांना परवानगी देण्यात आली होती. स्टेडियमपासून हॉटेलच्या खोल्यांपर्यंत सर्व सॅनिटाइझ केले होते.

एका दिवसात दोन सामने कमी असतील

लीगमध्ये जुन्या पद्धतीनुसार एकूण ६० सामने होणार आहेत. जुन्या कार्यक्रमानुसार केवळ पाच दिवस दोन सामने होत होते. आता नव्या कार्यक्रमानुसार दोन दिवस सामने कमी ठेवले जातील. सर्व ८ संघांचे स्पर्धा पूर्व शिबिर यूएईमध्ये बायो सुरक्षित वातावरणात होतील.