आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवा वाद:आयपीएलच्या नवीन संघ समावेशाबाबत बीसीसीआयमध्ये दुमत; गांगुलीला विराेध

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अहमदाबादसह कानपूर किंवा लखनऊ संघाचा समावेश होऊ शकतो

आयपीएल-१४ साठी दोन नव्या संघाच्या समावेशाबाबत बीसीसीआयमध्ये एकमत नाही. अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहासह काही वरिष्ठ अधिकारी टीमचा समावेश करण्याच्या बाजूने आहेत. काही इतर सदस्य टीमच्या समावेशाचा विरोध करत आहेत. २४ डिसेंबर रोजी एमजीएममध्ये त्यावर निर्णय घेतला जाईल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानुसार, “नव्या टीमचा समावेश करण्यासाठी खूप कमी कालावधी आहे. एवढ्या कमी वेळेत टेंडर, खेळाडूंचा लिलाव आदी गोष्टी शक्य नाही. संघाच्या संबंधित सर्व स्टेक होल्डरला एवढ्या कमी वेळेत एकत्र आणि एका व्यासपीठावर आणणे कठीण आहे. आमच्या मते, अनेक नवे संघ आयपीएल २०२२ मध्ये सोबत येऊ शकतात.’ अधिकाऱ्याने म्हटले की, “ब्रॉडकास्ट करार आयपीएल २०२१ नंतर समाप्त होत आहे. त्यानंतर टीम वाढल्यानंतर ब्रॉडकास्टिंग हक्क आणि इतर व्यावसायिक पार्टनरशिपच्या रकमेत आपोआप वाढ होईल. अखेरचा निर्णय एजीएममध्ये घेतला जाईल. मला वाटते की, संघ वाढवण्याचा निर्णय रद्द केला जाईल.’ इतर एका अधिकाऱ्याने म्हटले की,”८ ऐवजी १० टीम झाल्यास सामने ९४ होतील. म्हणजे आयपीएल विंडो खूप मोठी होईल. सध्याच्या परिस्थितीनुसार मोठ्या प्रमाणात स्पर्धांचे आयोजन करण्यास मर्यादा आहेत.’

दोन्हीपैकी एक टीम अहमदाबाद असेल
येत्या २४ डिसेंबर राेजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची खास बैठक हाेणार आहे. याच बैठकीत आयपीएलमधील नव्या दाेन संघाच्या समावेशााबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. बैठकीत नव्या संघाचा निर्णय निश्चित झाला तर एक फ्रँचायझी अहमदाबादची असेल. त्याबरोबर दुसरी टीम लखनऊ किंवा कानपूर असेल. पुणे देखील शर्यतीत आहे. यामध्ये आता टीम वाढवण्याचा निर्णय स्थगित केला तरी आयपीएल-२०२२ साठी अहमदाबादला प्राधान्य दिले जाईल. आता या पुढच्या वर्षीच्या लीगमध्ये नववी टीम अदानी ग्रुप वा संजीव गोयंका ग्रुप आरपीएसजी यांची असू शकते. हे दोन्ही ग्रुप अहमदाबाद फ्रँचायझी खरेदीसाठी शर्यतीत आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser