आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • BCCI Has Asked Indian Womens Cricket Team To Conduct The Corona Test On Their Own Before Entering Bio Bubble

महामारीतही भेदभाव:पुरुष खेळाडूंची घरी जाऊन कोरोना टेस्ट करून घेत आहे BCCI, महिला खेळाडूंना स्वतःच रिपोर्ट घेऊन येण्यास सांगितले

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) पुरुषवादी वृत्ती समोर आली आहे. भारताचे पुरुष आणि महिला हे दोन्ही संघ इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहेत. बोर्डाने पुरुष खेळाडूंना त्यांचे पत्ते विचारून कोरोना चाचणी करून घेतली आहे. एका खेळाडूची तीन-तीनदा टेस्ट होत आहे. त्याचवेळी, महिला खेळाडूंना स्वत: टेस्ट करून रिपोर्ट सोबत आणला तरच बायो बबलमध्ये प्रवेश देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

महिला आणि पुरुष संघाला 19 मे पर्यंत बबलमध्ये प्रवेश
महिला संघाला 19 मे पर्यंत बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर यापूर्वी बीसीसीआयने पुरुष संघाला 19 मेपर्यंत मुंबईत क्वारंटाईन होण्यास सांगितले होते. बोर्डाने खेळाडू मुंबईला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या घरीच कोरोना टेस्टची व्यवस्था केली आहे.जेणेकरून खेळाडूंना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. खेळाडूंसह इंग्लंडला जाणार्‍या कुटुंबातील सदस्यांचीही टेस्ट केली जाणार आहे. बबलमध्ये प्रवेशाच्या वेळी फक्त बोर्डच पुरुष खेळाडूंची टेस्ट करेल.

महिला खेळाडूने भास्करला काय सांगितले?
इंग्लंड दौर्‍यावर महिलांच्या टीमसोबत जाणार्‍या दोन खेळाडूंनी भास्करला सांगितले की, बोर्डाकडून माहिती मिळाल्यानंतर लगेच त्यांनी टेस्ट करून घेतली. रिपोर्ट मिळायलाही वेळ लागतो, म्हणून लवकर टेस्ट करून घेतली असे क्रिकेटपटूने सांगितले. महिला संघ इंग्लंडमध्ये 16 जून ते 15 जुलै दरम्यान 1 कसोटी, 3 एकदिवसीय सामने आणि टी-20 खेळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...