आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • BCCI 'Kohlise Panga...pada Bada Mahangha...'Fans Rejoice Over Sacking Of Selection Committee...expressed Their Joy Through Memes

BCCI-' कोहलीसे पंगा...पडा बडा महंगा...':निवड समितीच्या बरखास्तीवर चाहत्यांचा जल्लोष…मीम्सद्वारे केला आनंद व्यक्त

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

BCCI ने T20 वर्ल्ड कप 2022 मधील झालेल्या पराभवानंतर निवड समिती बरखास्त केली आहे. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. या निर्णयानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. या मीम्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

2022 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाला उपांत्य फेरीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आणि विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. टीम इंडिया गेल्या 15 वर्षांपासून टी-20 विश्वचषक स्पर्धेची वाट पाहत आहे.

या पराभवानंतर जनभावनेच्या उद्रेकाचा परिणाम दिसू लागला आहे. लोकांनी निवड समितीला जबाबदार मानले आहे त्याचाच एक परिणाम म्हणून BCCI ने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील संपूर्ण निवड समिती बरखास्त केली आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा ही घोषणा झाल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते, कारण गेल्या वर्षभरात घडलेल्या प्रकारामुळे सर्वजण नक्कीच निराश झाले होते...

तसेच सोशल मीडियावर चाहत्यांनी याला कर्मा म्हटले आहे, कारण निवडकर्त्यांनी ज्या पद्धतीने विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवले गेले, त्यामुळे त्याचे चाहते खूपच नाराज झाले होते.

T-20 विश्वचषक 2022 नंतर, चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती बरखास्त करण्यात आली होती, तर बरोबर एका वर्षापूर्वी म्हणजेच T-20 विश्वचषक 2021 नंतर, विराट कोहलीचे कर्णधारपदही काढून घेण्यात आले होते...

त्यानंतर विराट कोहली आणि निवड समितीमध्ये खूप वाद झाला होता. याशिवाय कोहलीचे सौरव गांगुलीसोबत भांडणही झाले होते.

मीम्सद्वारे चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

चाहत्यांनी मीम्सद्वारे हे दाखवले की सौरव गांगुली आता BCCI चा अध्यक्ष नाही, तसेच चेतन शर्माही आता निवड समितीचा अध्यक्ष नाही. पण किंग कोहली अजूनही किंग आहे.

टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचली होती, जिथे इंग्लंडने त्यांचा 10 विकेट्सने पराभव केला होता. ICC स्पर्धांमध्ये वारंवार होणाऱ्या पराभवामुळे चाहते संतापले होते आणि या रागाचा उद्रेक सेमी फयनलला झालेल्या पराभवानंतर झाला. त्यामुळे विश्वचषकापासून संघातील वरिष्ठ खेळाडू निशाण्यावर तर होते, सोबतच BCCI ला लक्ष्य करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...