आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीसीसीआयने आयपीएलसाठी जैवसुरक्षित वातावरणातून पुन्हा त्याच वातावरणात पाठवण्यास परवानगी दिली आहे. बीसीसीआयने आयपीएल-१४ साठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) आणि जैवसुरक्षित वातावरणातील नियम जाहीर केले. बीसीसीआयने म्हटले की, खेळाडू आपल्या राष्ट्रीय संघाच्या सुरक्षित वातावरणातून थेट फ्रँचायझीच्या सुरक्षित वातावरणात दाखल होऊ शकतात. त्यांना क्वॉरंटाइनची गरज नाही. भारत व इंग्लंडच्या संघातील खेळाडू सध्या मालिका खेळत आहे. म्हणजे त्या खेळाडूंना थेट फ्रँचायझी संघात दाखल होता येईल. त्याव्यतिरिक्त इतर सर्वांना ते खेळाडू, संघमालक, फ्रँचायझी व्यवस्थापन सदस्य, समालोचक, ऑफिशियलला सात दिवस क्वॉरंटाइनमधून जावे लागेल. बीसीसीआयने म्हटले की, “भारत-इंग्लंड मालिकेतील बायाे-बबलमधून येणाऱ्या खेळाडूंना फ्रँचायझीच्या हॉटेलमध्ये बस किंवा खासगी विमानाने यावे लागेल. विमान प्रवासादरम्यान सदस्यांनी सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
मुंबई व चेन्नईत सामने; प्रेक्षकांसाठी गाइडलाइन
बीसीसीआयने ९ ते २५ एप्रिलदरम्यान मुंबई व चेन्नईमध्ये होणाऱ्या सामन्याच्या प्रवेशासाठी प्रवेश नियम जाहीर केले. ब्रिटेन, मिडल ईस्ट, दक्षिण आफ्रिका, युरोप आदी भागातून मुंबईत येणाऱ्या लोकांना आपल्या खर्चाने सात दिवस क्वॉरंटाइन राहावे लागेल. चेन्नईतून येणाऱ्यांना तामिळनाडू सरकारच्या परवानगीचा पास दाखवावा लागेल.
खेळाडूंच्या संघ व्यवस्थापकांसाेबतच्या संवादाला ब्रेक
- जे फ्रँचायझी मालक आपल्या संघाच्या बायाे-बबलचे सदस्य बनू इच्छितात, दरम्यान त्यांना हाॅटेलमध्ये ७ दिवस क्वॉरंटाइन राहावे लागेल, हे सर्वांसाठी सक्तीचे असणार आहे. १२ बायो-बबल तयार करण्यात आले आहे.
- फ्रँचायझीसोबत लीगदरम्यान चार सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. जे जैवसुरक्षित वातावरणाचे शिस्तपालन निरीक्षकाच्या भूमिकेमध्ये काम करतील, ते संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघासोबत राहतील आणि प्रवास करतील. एखाद्या सदस्याने सुरक्षित वातावरणाच्या नियमाचे उल्लंघन केले तर सुरक्षा अधिकारी त्वरित बीसीसीआयच्या वैद्यकीय प्रमुखांना माहिती देतील.
- बीसीसीआय सर्वांना हातावरील बॅडच्या रूपात एक ट्रॅकिंग डिव्हाइस देईल, जे हॉटेल व इतर सर्व ठिकाणी घालणे आवश्यक असेल. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह आल्यास सहज ट्रेस करता येईल आणि त्यांच्या संपर्कात कोण कोण आले हे कळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.