आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:बीसीसीआय दोन संघांच्या तयारीत; स्वतंत्र टीम खेळणार कसाेटी, टी-२०

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे लीग अनिश्चित, नुकसान भरपाईच्या हालचालींना वेग

कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट पूर्णपणे ठप्प आहे. टी-२० लीग आयपीएललादेखील अनिश्चित काळासाठी स्थगित केले. अशात मंडळ कमी वेळेत अधिक सामने खेळून नुकसान भरपाई करण्यासाठी नियोजन करत आहे. त्यानुसार कसोटी आणि टी-२० मालिकेसाठी दोन वेगवेगळे संघ तयार करत आहे. दोघे सोबत मालिका खेळतील. अशात कमी वेळेत जास्तीत जास्त सामने खेळता येतील.

मंडळाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, ‘खेळ कधी सुरू होईल हे काेणाला माहिती नाही. प्रायोजक व चाहत्यांचा विचार केल्यास आम्हाला सर्वांचे लक्ष्य ठेवायचे आहे. अशात एक पर्याय आहे आम्ही दोन संघ बनवावे, जे सोबत कसोटी मालिका व टी-२० मालिका खेळतील.’ बीसीसीआयला ब्रॉडकास्टरचा हिताचा विचार करत दोन संघ बनवावे लागतील. दिवसा कसोटी लढत होईल आणि प्रकाशझोतात टी-२० सामन्याचे आयोजन केले जाईल. मात्र, दोन संघ बनवताना कोचिंग स्टाफवरदेखील काम करावे लागेल. कारण, एक कोचिंग स्टाफ दोन ठिकाणी काम करू शकत नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलियन टीमने असे केले आहे. २०१७ मध्ये २२ फेब्रुवारीला अॅडिलेडमध्ये श्रीलंकाविरुद्ध टी-२० सामना खेळला आणि नंतर २३ फेब्रुवारी रोजी पुण्यात कसोटी सामन्यास सुरुवात झाली. त्यासाठी दोन वेगवेगळ्या टीम बनवण्यात आल्या होत्या. काही असाच उपाय टीम इंडियादेखील करू शकते. टीम इंडियाला डिसेंबर-जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. येथे संघाला चार कसोटी खेळायच्या आहेत. मंडळाने खेळाडूंना दोन आठवडे क्वॉरंटाइन ठेवण्याची परवानगी दिली आहे. अशात सर्वच मंडळे नुकसान कमी करण्यासाठी कमी दिवसांत जास्तीत जास्त सामने खेळण्यासाठी तयारी करत आहेत.

नव्या सत्राची सुरुवात टी-२० ने हाेणार : जाेशी

भारतीय संघाचे निवड समितीप्रमुख सुनील जोशींनी बीसीसीआयला नव्या सत्राची सुरुवात टी-२० ने करण्याचे सुचवले आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय निवड समितीच्या व्हिडिओ बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला. मंडळ त्यावर सहमत असेल तर ऑगस्टमध्ये सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेने सुरुवात होऊ शकते. निवड समितीनुसार, त्यामुळे खेळाडू टी-२० विश्वचषकासाठी तयार होऊ शकतील. विश्वचषकाचे सामने ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नाेव्हेंबरमध्ये होतील. आयपीएलच्या आयोजनावर शंका आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू घरच्या क्रिकेटला प्राथमिकता देत नाहीत. त्यांना या स्पर्धेद्वारे सराव करण्याची संधी मिळेल.

बातम्या आणखी आहेत...