आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सप्टेंबरमध्ये हाेणारी आशिया कप स्पर्धा रद्द झाल्याची घोषणा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने केली. पाकिस्तानकडे स्पर्धेचे यजमानपद होते. मात्र, भारताने आपत्ती व्यक्त केल्यानंतर यूएईमध्ये त्याच्या आयोजनाची चर्चा होती. त्यांनी रद्द होण्यामागचे कारण सांगितले नाही. मात्र, पीसीबीचे अध्यक्ष एहसान मनीने म्हटले की, आम्हाला आशियाई क्रिकेट संघटनेकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या मते, प्रत्येक मालिकेत एक दिवस-रात्र कसोटीचे आयोजन करावे. अशा क्रिकेटमुळे कसोटीची लोकप्रियता वाढेल. ज्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षक स्टेडियममध्ये बसून सामना पाहण्यासाठी आकर्षित होतील.
देशात आयपीएलचे आयोजन आमची प्राथमिकता
गांगुलीने म्हटले की, देशात आयपीएलचे आयोजन करण्याची आमची प्राथमिकता आहे. श्रीलंका, यूएई, न्यूझीलंडने या टी-२० लीगच्या आयोजनासाठी प्रस्ताव दिला आहे. आयपीएल विदेशात होईल, या गोष्टीचे गांगुलीने खंडन केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.