आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत आढावा बैठक घेतली. या बैठकीला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, NCA प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण, BCCI चे प्रमुख रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि माजी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा उपस्थित होते.
आशिया चषक आणि टी-20 विश्वचषकातील पराभवाबाबत सर्वांनाच प्रश्न विचारले गेले. यासोबतच 2023 च्या वनडे विश्वचषकासाठी 20 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
BCCI च्या आढावा बैठकीतील 3 मुद्दे...
फक्त 20 खेळाडूंना संधी मिळणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2023 वनडे विश्वचषकासाठी ज्या 20 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. विश्वचषकापूर्वी टीम इंडियात त्यांनाच खेळवले जाईल आणि जे खेळाडू चांगली कामगिरी करतील, त्यांच्यामधूनच विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघ बनवला जाईल.
वनडे विश्वचषकापूर्वी भारत 3 वनडे सामन्यांची 5 मालिका खेळणार आहे. तसेच, 50 षटकांचा आशिया कपही खेळवला जाणार आहे.
म्हणजे 20 खेळाडूंपुढे स्व:ताला सिद्ध करण्यासाठी 15 पेक्षा जास्त वनडे सामने असतील. यावेळी एकदिवसीय विश्वचषक पूर्णपणे भारतात खेळवला जाईल. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयोजित केले जाईल. मात्र, निवडलेल्या 20 खेळाडूंची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.
4 तासापर्यंत सुरू होती बैठक
मुंबईत कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि टीम इंडियाचे माजी सिलेक्टर चेतन शर्मा यांच्यासोबतची बैठक सुमारे 4 तास चालली. या बैठकीत आशिया चषक आणि टी-20 विश्वचषकातील भारताच्या पराभवावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. यासोबतच 2023 मध्ये टीम इंडियाच्या टार्गेटवरही विचारमंथन करण्यात आले.
भारताला 2023 मध्ये वनडे विश्वचषक खेळायचा आहे. यासोबतच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही यंदा होणार आहे. जर भारताने फेब्रुवारी-मार्च दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची मालिका जिंकली तर संघ सलग दुसऱ्यांदा WTC ची अंतिम फेरी खेळू शकेल. गेल्या वेळी टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेटने पराभूत झाली होती.
2023 मध्ये पुरुष क्रिकेटच्या 4 प्रमुख स्पर्धा होणार आहेत…
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य देणार
BCCI चे अध्यक्ष रॉजर बिन्नी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित होते. टीम इंडिया आगामी काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि द्विपक्षीय मालिकांना प्राधान्य देणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. BCCI च्या सूत्रांनी सांगितले की, या काळात इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) नेमक्या आयोजनाचीही काळजी घेतली जाईल.
IPL मधील खेळाडूंवर लक्ष ठेवणार
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) IPL फ्रँचायझीच्या सहकार्याने भारतीय खेळाडूंच्या खेळावर आणि फिटनेसवर लक्ष ठेवेल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. NCA खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटवरही लक्ष ठेवेल. जेणेकरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दडपण भारताच्या प्रमुख खेळाडूंवर येऊ नये.
फिटनेसबाबत दक्षता
बैठकीत, फिटनेस आजमवण्यासाठी पुन्हा एकदा यो-यो चाचणीचा उल्लेख करण्यात आला. BCCI ने निर्णय घेतला की खेळाडूंचा फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियाचा भाग होण्यासाठी त्याला यो-यो चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
यासोबतच यशस्वी जैस्वाल, शिवम मावी, अर्शदीप सिंग या उदयोन्मुख खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागणार आहे. देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतरच हे खेळाडू टीम इंडियामध्ये निवडीसाठी पात्र ठरतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.