आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:सौरव गांगुलीकडील आयसीसी नेतृत्वाच्या चर्चेला ब्रेक; शशांक मनाेहर यांचा कार्यकाळ पूर्ण

रायपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईसीबीचे काॅलिन ग्रेव्हज आयसीसी अध्यक्षपदी!

शेखर झा 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीकडे आयसीसीच्या नेतृत्वाची धुरा साेपवल्या जाण्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला. गांगुली आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान हाेणार नाही, हे आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.

सध्याचे आयसीसी अध्यक्ष शशांक मनाेहर यांचा कार्यकाळ याच महिन्यात पूर्ण हाेत आहे. त्यांनी कार्यकाळ वाढवून घेण्यास नकार दर्शवला. त्यामुळे अशात गांगुलीच्या आयसीसी अध्यक्षपदी नियुक्तीच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. शशांक मनाेहर यांची २०१८ मध्ये दाेन वर्षांसाठी पुन्हा बिनविराेध आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली हाेती. त्यामुळे आता त्यांचा कार्यकाळ पूर्ण हाेत आहे. अशात लाॅकडाऊनचे संकट आेढावलेले आहे. त्यामुळे सर्वच इव्हेंट सध्या बंद आहेत. अशात मनाेहर यांच्या कार्यकाळात वाढ व्हावी, अशी मागणी केली जात हाेती. मात्र, मनाेहर यांनी यासाठी आपणच उत्सुक नसल्याची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आता गांगुलीच्या चर्चेवर पडदा पडला. तसेच इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळाचे चेअरमन काॅलिन ग्रेव्हज यांचा आयसीसी अध्यक्षपदी विराजमान हाेण्याचा मार्ग सुकर झाला. मात्र, यादरम्यान सर्वच क्रिकेटपटूंची गांगुलीच्या नावालाच पहिली पसंती हाेती. गांगुलीमध्ये कुशल नेतृत्वाचा गुण असल्याची प्रतिक्रियाही आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक यांनी दिली हाेती.

बातम्या आणखी आहेत...