आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराBCCI ने 2022 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंची नावे जाहीर केली आहेत. BCCI ने कसोटी, वनडे आणि टी-20 मध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या फलंदाज आणि गोलंदाजांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत अनेक दिग्गज खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
2022 हे वर्ष भारतीय संघासाठी फारसे चांगले राहिले नाही. आशिया चषक आणि T20 विश्वचषक स्पर्धेत संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते पण काही खेळाडू असे होते ज्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले.
सूर्यकुमार यादव सर्वोत्कृष्ट फलंदाज
BCCI ने सूर्यकुमार यादवची 2022 चा सर्वोत्कृष्ट T-20 भारतीय फलंदाज म्हणून निवड केली आहे. त्याने यावर्षी 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1164 धावा केल्या. यादरम्यान त्याने दोन शतके आणि 9 अर्धशतकेही झळकावली. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारची T-20 चा सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी त्याने 6.98 च्या इकॉनॉमी रेटने 37 विकेट घेतल्या होत्या. मात्र, असे असूनही श्रीलंकेविरुद्धच्या आगामी T20I मालिकेसाठी भुवनेश्वर कुमारची निवड झालेली नाही.
श्रेयस अय्यरला वनडेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज निवडले
श्रेयस अय्यरला वनडे फॉरमॅटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवण्यात आले आहे. त्याने 2022 मध्ये वनडे सामन्यांमध्ये 15 डावांमध्ये 724 धावा केल्या आणि या कालावधीत त्याची सरासरी 55.69 होती. यादरम्यान त्याने एक शतक आणि सहा अर्धशतके झळकावली. त्याच वेळी, मोहम्मद सिराजची सर्वोत्तम एकदिवसीय गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे, ज्याने 15 सामन्यांमध्ये 4.62 च्या इकॉनॉमी रेटने 24 विकेट घेतल्या आहेत.
कसोटीत ऋषभ आणि जसप्रीत सर्वोत्कृष्ट
ऋषभ पंतला कसोटी क्रिकेटमधील संघाचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून गौरवण्यात आले. त्याने यावर्षी 12 डावांमध्ये 61.81 च्या प्रभावी सरासरीने 680 कसोटी धावा केल्या. या वर्षी कसोटी सामन्यांमध्ये 500 हून अधिक धावा करणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू होता. जसप्रीत बुमराहला कसोटी प्रकारातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निवडण्यात आले. त्याने 10 डावात 22 विकेट घेतल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.