आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 गडी राखून दणदणीत पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ही हादरले आहे. टीम इंडियाच्या कामगिरीवर BCCI नाराज आहे.
स्पोर्ट्स पोर्टल 'इनसाइड स्पोर्ट'नुसार - BCCI लवकरच एक आढावा बैठक घेणार आहे. या बैठकीत प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांना बोलावण्यात येणार आहे.
जय शहा यांच्या अध्यक्षस्थानी होणार बैठक
BCCI चे सचिव जय शाह या बैठकीत टीम इंडियाच्या खराब कामगिरीचा आढावा घेणार आहेत. बोर्डाच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार - आम्ही एक बैठक घेणार आहोत. या उपांत्य फेरीतील पराभवातून आम्हीही सावरलेलो नाही.
खरे तर संघात बदल करण्याची आवश्यकता आहे. पुनरावलोकनात संघाचे ऐकणे देखील महत्त्वाचे आहे. याशिवाय कोणत्याही परिणामापर्यंत जाता येणार नाही. त्यामुळे रोहित, द्रविड आणि कोहली यांचे म्हणणे ऐकून भविष्यातील टी-20 संघाचे नियोजन केले जाईल.
निवड समितीही वादाच्या भोवऱ्यात
मीडिया रिपोर्ट्सनुसार- BCCI ही निवड समितीच्या कामगिरीवर नाराज आहे. निवड समितीचे अध्यक्ष माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा आहेत. या बैठकीत निवड समितीच्या कामगिरीचाही आढावा घेतला जाणार आहे.
चेतन शर्माला निवड समितीच्या प्रमुखपदावरून हटवले जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र, चेतन स्वत: या बैठकीचा भाग असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आता 2024 मध्ये T-20 विश्वचषक
पुढील T-20 विश्वचषक 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि USAमध्ये खेळवला जाईल. BCCI ला विश्वास आहे की तोपर्यंत बहुतेक ज्येष्ठ खेळाडू टी-20 फॉरमॅट स्वतःहून सोडतील. BCCI चे अधिकारी म्हणाले- आम्ही कोणा एका खेळाडूचा विचार करत नाही तर संपूर्ण संघाचा विचार करत आहोत.
खेळाडू स्वतः निर्णय घेऊ शकतात. आम्ही क्रिकेट आणि टीम इंडियाचा विचार करत आहोत. इंग्लंडसोबतच्या उपांत्य फेरीतील आणि बाद फेरीतील सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीनंतर हे सर्व थांबले पाहिजे. बाद फेरीतील टीम इंडियाची खराब कामगिरी रोखण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.