आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची उलाढाल साडचौदा हजार काेटींची अाहे. गतवर्षी अायपीएलच्या अायाेजनातून ४ हजार काेटींची कमाई करणाऱ्या याच बीसीसीअायची युवा खेळाडूंसाठी अार्थिक मदतीची घाेषणा हवेत विरली. घोषणेच्या पाच महिन्यांनंतरही अद्याप अडचणीत सापडलेल्या खेळाडूंना छदामही मिळाला नाही. याशिवाय प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंना विजय हजारे अाणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील सामनानिधीही अद्याप मिळालेला नाही.
बीसीसीआयच्या या दिरंगाईच्या खेळीचा २५०० पेक्षा अधिक खेळाडू अाणि ४०० स्टाफला फटका बसत अाहे. राज्य संघटनाही वार्षिक निधीपासून वंचित अाहेत. काेराेनाच्या संकटामुळे गतवर्षीची रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्यात अाली. ही नुकसानभरपाई देण्याची घोषणा बीसीसीआयने केली हाेती. महिला खेळाडूदेखील मानधनापासून वंचित अाहेत.
७६ टीमच्या १४४ खेळाडूंचे सामना फीसाठी दाेन महिन्यांपासून वेट अँड वाॅच
बीसीसीअायने जानेवारी ते मार्चदरम्यान अापल्या देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी व विजय हजारे ट्राॅफी क्रिकेट स्पर्धांचे अायाेजन केले. या स्पर्धांत प्रत्येकी ३८ संघांचे १४४ खेळाडू सहभागी हाेते. अद्याप या सर्व खेळाडूंना सामनानिधी मिळाली नाही. विजय हजारे ट्राॅफीच्या एका सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूला ३५ हजार व प्लेइंग इलेव्हनबाहेर असलेल्यास १७,५०० रुपये मिळतात. तसेच मुश्ताक अली ट्राॅफीमधील एका सामन्यासाठी १७ हजार व मैदानाबाहेर बसलेल्या खेळाडूस ८७५० रुपये मिळतात.
खेळाडूंना मिळणारे मानधन
स्पर्धा सामने एक सामना एकूण
रणजी ट्रॉफी 9 1.40 लाख 13.32 लाख
विजय हजारे ट्रॉफी 6 35 हजार 3.33 लाख
मुश्ताक अली ट्रॉफी 6 17,500 1.15 लाख
अद्याप काेणतेही नियाेजन नाही, अाम्ही फीडबॅक घेत अाहाेत : अरुण धुमाळ
अाम्ही स्पर्धेच्या स्थगितीमुळे अाणि काेराेनाच्या संकटामुळे खेळाडूंना नुकसान भरपाई म्हणून अार्थिक मदतीची घाेषणा केली. मात्र, ही अार्थिक मदत कोणत्या खेळाडूंना द्यावी, कुणाची नावे यासाठी निवडावी, असा माेठा पेच राज्य संघटनांसमाेर निर्माण झाला अाहे. याशिवाय अामच्याकडेही याबाबतचे काेणतेही ठाेस असे नियाेजन नाही. अाम्हीही फीडबॅक घेत अाहाेत. गत तीन महिन्यांपासून अाम्ही पूर्णपणे अायपीएलच्या अायाेजनात व्यग्र हाेताे. त्यामुळेच हा गंभीर विषय मागे पडला अाहे. मात्र, अाम्ही लवकरच याबाबत ठाेस असा निर्णय घेणार अाहाेत, अशी प्रतिक्रिया बीसीसीअायचे काेषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी “दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.
प्लेइंग इलेव्हनबाहेर असलेल्या खेळाडूंनाही मिळते अर्धी रक्कम
स्पर्धा मॅच फी रणजी ट्राॅफी 70,000 विजय हजारे ट्राॅफी 17,500 मुश्ताक अली ट्राॅफी 8750
नुसतीच घाेषणा : कुणाला किती रक्कम याची गाइडलाइन नाही
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशांतर्गत स्पर्धेचे अायाेजन करण्यात अडचणी निर्माण हाेत असल्याने खेळाडूंना अार्थिक मदतीची घाेषणा केली हाेती. रणजी ट्रॉफी स्पर्धा स्थगित झाली. त्यामुळे या स्पर्धेतून युवा खेळाडूंना माेठी कमाई करता येते. मात्र, स्थगितीमुळे खेळाडूंच्या कमाईला फटका बसला. हीच गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन बीसीसीअायने ही नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले. मात्र, काेणत्या खेळाडूला किती रक्कम द्यायची, याबाबत काेणतीही गाइडलाइन निश्चित करण्यात अाली नाही. हीच अार्थिक मदत कशी करावी, याबाबत बीसीसीअायसमाेर पेच निर्माण झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.