आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Ben Stokes Caught Applying Saliva On The Pink Ball In India Vs England 3rd Test Day Ight Test, Umpire Nitin Menon Had A Chat With Him

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्लंडने मोडला कोरोना नियम:स्ट्रोक्सने बॉलवर लावली लाळ; अंपायरचा इशारा- अजून दोनदा असे केल्यास भारताच्या खात्यात 5 धावा जाणार

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोहली आणि स्टोक्समध्ये शाब्दीक चकमक

भारत आणि इंग्लंड संघादरम्यान तिसरा कसोटी सामना अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडीयमवर सुरू आहे. भारतीय संघाच्या डावादरम्यान इंग्लंड संघाचा ऑलराऊंडर बेन स्टोक्सने बॉलला चमकवण्यासाठी लाळेचा वापर केल्याचे समोर आले आहे. कोरोना काळात बॉलवर लाळेचा वापर करण्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बंदी घातलेली आहे. स्टोक्सने केलेल्या या घटनेनंतर बॉलला सॅनिटाईज करण्यात आले आणि मैदानात उपस्थित अंपायर नितीन मेमन यांनी स्टोक्सला इशाराही दिला.

आयसीसीच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही संघाला कोरोना नियम मोडताना दिसल्या, दोनदा इशारा दिला जाईल. तिसऱ्यांदा विरुद्ध संघाच्या खात्यात पाच धावा जोडल्या जातील. ही घटना भारतीय संघाच्या डावादरम्यान 12 ओव्हरमध्ये घडली.

शुभमन गिलची कॅच सोडल्यानंतर जल्लोष
बेन स्टोक्सने शुभमन गिलच्या फलदांजी दरम्यान बॉल जमिनीला टेकला असतानाही कॅच घेतल्याचे सांगत जल्लोष सुरू केला. यानंतर तिसऱ्या अंपायने टीव्हीच्या माध्यमातून चेक केले आणि बॉल जमिनीला लागल्याचे दिसले.

कोहली आणि स्टोक्समध्ये शाब्दीक चकमक

बेन स्टोक्सने इंग्लंड संघाच्या डावादरम्यान काही वेळासाठी सामना बंद ठेवला होता. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीत बातचीत करण्यासाठी गेला असता दोघांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बातम्या आणखी आहेत...