आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Big Blow To Team India Before T 20 Series Against Sri Lanka, Match Winner Player Out Of Series Due To Injury | Marathi News | Matchwinner Deepak Chahar Out Of The Series, A Big Blow To The Indian Team Before The Series Against Sri Lanka

चहरला दुखापत:श्रीलंकेविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर दीपक चहर संघाबाहेर

लखनौ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या एका मॅचविनर खेळाडूला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे हा खेळाडू श्रीलंकेविरुद्धची मालिका खेळू शकणार नाही. भारत आणि श्रीलंकेच्या टी-20 सामन्याला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारताला मोठा झटका बसला आहे.

भारताच्या विजयात अमूल्य असे योगदान देणाऱ्या अष्टपैलू दीपक चहरला गंभीर दुखापत झाली आहे. दीपकच्या पायांच्या स्नायूंना मार लागले आहे. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याने त्याला आता श्रीलंकेविरुद्धचा टी-20 सामना खेळता येणार नाही. यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्धची सुरू होण्यापूर्वी भारताच्या चार खेळाडूंना गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले होते. आणि त्यांना देखील मालिकेपासून मुकावे लागले आहे. गुरुवारपासून भारताचा सामना श्रीलंकेसोबत होण्यापूर्वीच भारताच्या पदरी निराशा पडली आहे. दीपक हा चांगली वेगवाग गोलंदाजी तर करतच होता, पण तो संघासाठी उपयुक्त फलंदाजीही करत होता. त्यामुळे संघासाठी तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू बनला होता. त्याचबरोबर संघाच्या विजयातही त्याने आतापर्यंत चांगलाच हातभार लावला होता.

पण आता दीपक श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही. दीपकच्या दुखापतीबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती बीसीसीआयने दिलेली नाही. त्यामुळे दीपक किती काळ संघाबाहेर राहू शकतो, हे अजून समजू शकलेले नाही. पण दीपकच्या जागेवर आता पर्यायी खेळाडू बीसीसीआयला निवडावा लागणार आहे. त्यामुळे आता दीपकच्या जागी भारतीय संघात कोणच्या खेळाडूची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...