आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा:कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितसाठी नामी संधी; माजी ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विराटच्या 86 कसोटीत 7240 तर रोहितच्या 32 कसोटीत 2141 धावा

टीम इंडिया ऑस्ट्रेलियात डेरेदाखल झाली असून कर्णधार विराट कोहली एका कसोटीनंतर पितृत्व रजेवर जाणार आहे. तेथेच रोहित ‘वन डे’ आणि ‘टी-२०’ सोडून येथे क्रिकेट खेळण्यास पोहोचेल.

याबाबत बोलताना माजी ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा म्हणाला, कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित कडे कर्णधार व फलंदाज म्हणून स्वत:ची क्षमता सिद्ध करण्याची नामी संधी आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात चार कसोटी, तीन ‘वन डे’ आणि तीन ‘टी-२०’ सामने खेळायचे आहेत. २७ नोव्हे. पासून एकदिवसीय आणि ४ डिसेंबरपासून ‘टी-२०’ मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर १७ डिसेंबरला ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. याआधी २०१८ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी कसोटी सामन्यात ३-१ ने दणकून मात दिली होती.

पुजारानुसार भारतीय गोलंदाजी मजबूत

दुसरीकडे चेतेश्वर पुजाराने भारतीय गोलंदाजी चांगलीच मजबूत असल्याचे सांगितले. २०१८ च्या मालिकेत ज्याप्रमाणे टीम इंडियाची गोलंदाजी होती तशीच आताही आहे. जरी ऑस्ट्रेलिता संघात स्मिथ, वाॅर्नरसारखे दणकट फलंदाज परतले आहेत. तसेच मार्नस लाबुशानेसारखे उत्तम खेळाडूही आहेत. असे असले तरी त्यांना सहज विजय मिळणार नाही. आमचे गोलंदाज त्यांना झटपट तंबूत पाठविण्याची क्षमता राखून असल्याचे मत व्यक्त केले.

भारतीय फलंदाजी मजबूत :

यावेळी पुजारासाठी ऑस्ट्रेलिया दौरा हा सहज सोपा राहणार नाही. तेथेच रोहित शर्माही अग्रणी फलंदाज आहे. त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. कोहली भारतात परतल्यानंतर त्याच्याकडे संधी असेल. आपण काय करू शकतो, हे क्रिकेट जगताला दाखवण्याची त्याच्याकडे संधी आहे. टीम इंडियात सध्या दर्जेदार फलंदाजांचा भरणा असल्याने कोणालाही एकाच खेळाडूवर लक्ष केंद्रित करता येणार नाही. भारताची फलंदाजी मजबूत आहे. यात पुजारा, अजिंक्य रहाणे आणि लोकेश राहुल सारख्या दिग्गज फलंदाजांचा समावेश असल्याचे मत मॅक्ग्राने व्यक्त केले.

कोहलीच्या परतण्याने टीम इंडियाचे नुकसान

विराटसारख्या दर्जेदार व अव्वल खेळाडूचे संघातून परतणे टीम इंडियासाठी नुकसानदायक ठरणार आहे. कारण तो मैदानावर दुहेरी भूमिका वठवत असतो. एक फलंदाज म्हणून आणि दुसरा कर्णधार म्हणून मैदानावर सतत ऊर्जा कायम ठेवण्याचे त्याचे काम असते. तिकडे स्टीव्ह स्मिथ व डेव्हीड वाॅर्नर परतल्या मुळे ऑस्ट्रेलिया संघ मजबूत झाला आहे. अशात यजमानांकडे हिशेब चुकता करण्याची संधी असल्याचे मत कोहली पितृत्व रजेवर जाणार असल्याने मॅक्ग्राने व्यक्त केले. याआधी २०१८ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी कसोटी सामन्यात ३-१ ने दणकून मात दिली होती. त्यावेळी स्मिथ आणि वाॅर्नर चेंडू कुरतडल्यामुळे प्रतिबंधाचा सामना करत होते. पुजाराने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ७४.४२ च्या सरासरीने ५२१ धावा ठोकल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...