आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Biggest Innings In ODI History: N Jagdeesan Hits 277 Runs, Breaks Rohit's Record, 500 Runs In 50 Overs For The First Time

लिस्ट-A क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी खेळी:एन. जगदीशनच्या 277 धावा, रोहितचा मोडला विक्रम, पहिल्यांदाच 50 षटकांत 500 धावा

स्पोर्ट्स डेस्क7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूचा फलंदाज नारायण जगदीशनने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये ऐतिहासिक खेळी केली आहे. 26 वर्षीय जगदीशनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध 277 धावा काढले. वनडे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. रोहित शर्माने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये भारताकडून खेळताना श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची इनिंग खेळली होती.

लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याच्या आधी सरेचा फलंदाज एलिस्टर ब्राऊनने 2002 मध्ये 268 धावा केल्या होत्या. जगदीशनने या दोघांचे रेकॉर्ड तोडले.

जगदीशनच्या खेळीने सोमवारी बंगळुरूमध्ये तामिळनाडूला 506/2 धावा करता आल्या. वनडेमध्ये पहिल्यांदाच 500 पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. यापूर्वी इंग्लंडने नेदरलँड्सविरुद्ध 498 धावा केल्या होत्या.

शेवटच्या पाच डावात 5 शतके

विजय हजारे ट्रॉफीच्या या हंगामात जगदीशन दमदार फलंदाजी करताना दिसत आहे. गेल्या 5 डावात त्याने सलग 5 शतके झळकावली आहेत. या फलंदाजाने श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराचा विक्रम मोडला आहे.

आता पाहा जगदीशनची दमदार खेळी

जगदीशनने 141 चेंडूत 196.45 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने 141 चेंडूत 25 चौकार आणि 15 षटकार ठोकले.

कोण आहे नारायण जगदीशन?

नारायण जगदीशन हा तमिळनाडूचा विकेटकीपर फलंदाज आहे. तो फलंदाजीसाठी सलामीला उतरतो. जगदीशनने IPL मध्ये चेन्नईकडून 7 सामनेही खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर फक्त 73 धावा आहेत. त्याने आतापर्यंत 41 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 7 शतकांसह 45 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत.

लिस्ट-ए क्रिकेट म्हणजे काय?

लिस्ट-ए सामना हा मर्यादित षटकांचा (वनडे) क्रिकेटचा फॉरमॅट आहे. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये षटकांची मर्यादा 40 ते 60 पर्यंत असू शकते. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट, मर्यादित षटकांचे देशांतर्गत क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने देखील समाविष्ट आहेत ज्यांना ICC द्वारे अधिकृत ODI (एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट) दर्जा दिलेला नाही.

बहुतेक क्रिकेट खेळणाऱ्या राष्ट्रांमध्ये लिस्ट-ए क्रिकेटचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसे की भारतात विजय हजारे ट्रॉफी आणि देवधर ट्रॉफी. त्याचप्रमाणे इंग्लंडमधील रॉयल लंडन वन-डे कप आणि ऑस्ट्रेलियातील जेएलटी वन-डे कप प्रसिद्ध आहेत.

बातम्या आणखी आहेत...