आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकटकमधील रविवारची संध्याकाळ हार्दिक पांड्यासाठी हृदयद्रावक ठरली. येथे खेळल्या गेलेल्या भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तो 9 धावांच्या माफक धावसंख्येवर बाद झाला.
हार्दिकला वेन पेर्नेलने बोल्ड केले. एवढेच नाही तर पर्नेलने त्याला हाताद्वारे ‘दिल’च्याआकाराचा चिन्ह दाखवून त्याला छेडले. काही सोशल मीडियाचे चाहते या मजेदार क्षणाला 'लव्ह इट' मानत आहेत, तर काहीजण हार्दिकचे हृदय मोडले असं म्हणताहेत.
ही घटना दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावातील आहे. ऋषभ पंत लवकर बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या फलंदाजीला आला. अशा स्थितीत भारतीय चाहत्यांच्या आशा त्याच्यावर पल्लवित झाल्या होत्या, मात्र 13व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने हार्दिकला त्रिफळाचीत केले. तो लो ऑन स्विंगवर आऊट झाला.
पर्नेलने त्याची विकेट वेगळ्या पद्धतीने साजरी केली. पर्नेलने लवचे चिन्ह दाखवून हार्दिकची छेड काढली. मात्र, हार्दिकने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
भारताचा चार विकेट्सनी झाला पराभव
टीम इंडियाने हा सामना चार विकेटने गमावला. मालिकेत ते 2-0 ने पिछाडीवर आहेत. प्रथम खेळताना भारतीय संघाने 6 बाद 148 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने 18.2 षटकांत 6 गडी गमावून आवश्यक धावा केल्या.
पंड्या दुखापतीतून सावरलाआहे
हार्दिक पांड्या दुखापतीतून सावरला आहे. दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. हार्दिकने वर्ल्डकपमध्ये पुनरागमन केले होते मात्र त्यावेळी तो गोलंदाजी करताना दिसला नाही.
IPL-15 मध्ये शानदार कामगिरी
हार्दिक पांड्याने IPL-15 मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. त्याने आपल्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.