आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • IPL 2023, Brian Lara Appointed As Head Coach Of SRH, Replacing Tom Moody, Who Was The Batting Coach Last Season

ब्रायन लारा SRH च्या हेड कोचपदी नियुक्त:टॉम मूडीची घेणार जागा, गेल्या हंगामात होते फलंदाजीचे कोच

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारा यांची सनरायझर्स हैदराबाद (SRH) च्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते टॉम मूडीची जागा घेणार आहे. ते पहिल्यांदाच टी-20 टीमचे मुख्य प्रशिक्षक बनले आहे.

फ्रँचायझीने शनिवारी आपल्या अधिकृत साइटवरून ही घोषणा केली आहे. 53 वर्षीच्या कॅरेबियन स्टारचे फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिले - 'क्रिकेटचे लीजेंड म्हणून ओळखले जाणारे ब्रायन लारा येत्या हंगामासाठी आमचे मुख्य प्रशिक्षक असतील.'

तसेच टॉम मूडीच्या फोटोसोबत त्यांनी लिहिले - 'यांच्या सोबतचा आमचा करार संपला आहे. टॉम त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या सोबत सुरूअसणारा अनेक वर्षांचा आमचा हा प्रवास सुंदर होता. आम्ही त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.

लारा यांनी 2021 मध्ये हैदराबाद टीमचे फलंदाजी कोच म्हणून काम केले

2016 मध्ये मूडीजने SRH ला चॅम्पियन बनवले होते

हैदराबादने बंगळुरूचा 8 धावांनी पराभव करून ट्रॉफीवर नाव कोरले.
हैदराबादने बंगळुरूचा 8 धावांनी पराभव करून ट्रॉफीवर नाव कोरले.

ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक टॉम मूडी 2013 मध्ये SRH सोबत हेड कोच म्हणून जॉईन झाले होते. ते 2019 पर्यंत टीमसोबत राहिले. यादरम्यान ‘SRH टीम 5 वेळा प्लेऑफमध्ये पोहोचली होती आणि 2016 मध्ये IPL चॅम्पियनही झाली.

2020 मध्ये, ऑस्ट्रेलियाचे ट्रेव्हर बेलिस मूडीच्या जागी हेड कोच बनले. त्यानंतर मूडी गेल्या वर्षी SRH मध्ये मार्गदर्शक म्हणून परतले होते त्यानंतर त्यांची हेड कोचपदी नियुक्ती करण्यात आली.

मूडी व्हायपर्सचे हेड कोच बनणार

टॉम मूडी आता डेझर्ट वायपर्ससाठी क्रिकेटचे डायरेक्टर म्हणून जाणार आहेत. वाइपर्सची टीम इंटरनॅशनल लीग T-20 ची फ्रँचायझी आहे. या लीगचे आयोजन UAE मध्ये केली जाते.

बातम्या आणखी आहेत...