आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिस्बेन कसोटी:13 वर्षे, 10 सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया दोन्ही डावांत ऑलआऊट; भारतासमोर 328 धावांचे लक्ष्य

ब्रिस्बेन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मैदानावर 236 धावांचे लक्ष्य आतापर्यंत अधिक खडतर; मात्र, पाकच्या 2016 मध्ये दुसऱ्या डावात 450 धावांची खेळी

जमान ऑस्ट्रेलिया संघाने साेमवारी भारताविरुद्ध चाैथ्या आणि शेवटच्या कसाेटी सामन्याच्या दुसऱ्या डावात २९४ धावा काढल्या. यासह ऑस्ट्रेलियाने चाैथ्या दिवशी भारतासमाेर ३२८ धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय संघाने प्रत्युत्तरात बिनबाद ४ धावा काढल्या. त्यामुळे ३२४ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाचे शुभमान गिल (०) आणि राेहित शर्मा (४) हे दाेघेही सलामीवीर मैदानावर कायम आहेत. पावसाच्या व्यत्ययाने चाैथ्या दिवसाचा खेळ लवकर संपला. यजमान ऑस्ट्रेलिया संघ १३ वर्षे आणि १० सामन्यांनंतर ब्रिस्बेनच्या मैदानावर पहिल्यांदाच दाेन्ही डावांत ऑलआऊट झाला.

ब्रिस्बेनच्या मैदानावर आता भारतासाठीची वाट अधिक खडतर मानली जाते. कारण, या ठिकाणी आतापर्यंत २३६ धावांचे लक्ष्य अधिक आव्हानात्मक ठरलेले आहे. मात्र, याच मैदानावर २०१६ मध्ये पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात ४५० धावांची खेळी केली हाेती.

यजमान ऑस्ट्रेलिया संघाने कालच्या बिनबाद २१ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. सलामीवीर हॅरीस (३८) आणि डेव्हिड वाॅर्नर (४८) यांनी दमदार सुरुवात करताना संघाला ८९ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. दरम्यान शार्दूल आणि सिराजने भेदक माऱ्याने ऑस्ट्रेलिया संघाचे कंबरडे माेडले. यातूनच टीमने १२३ धावांसाठी चार विकेट गमावल्या. त्यानंतर स्मिथ (५५), कॅमरून ग्रीन (३७) आणि पॅट कमिन्सने (नाबाद २८) टीमच्या धावसंख्येला गती दिली.

सिराजचे ५ बळी; ४४ वर्षांनंतर मदन लाल यांच्या कामगिरीला उजाळा

भारताकडून सिराज व शार्दूलने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २९४ धावांत गुंडाळले. यात सिराजने ५ व शार्दूलने ४ बळी घेतले. यातून ऑस्ट्रेलियाचा माेठ्या आघाडीचा प्रयत्न अपयशी ठरला. वेगवान गाेलंदाज सिराजने ४४ वर्षांनंतर सर्वाेत्तम कामगिरीची नाेंद केली. यापूर्वी १९७७ मध्ये मदन लालने ७२ धावा देत पाच विकेट घेतल्या हाेत्या. आता सिराजने तब्बल ४४ वर्षांनंतर या कामगिरीला उजाळा दिला आहे. त्याची यादरम्यानची गाेलंदाजी लक्षवेधी ठरली.

बातम्या आणखी आहेत...