आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसाेटी क्रमवारी:बुमराह, अश्विनची प्रगती, भारताचा राेहित नवव्या स्थानी कायम; स्मिथची दुसऱ्या स्थानावर धडक

दुबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेल्या वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह आणि आर. अश्विन यांनी कसाेटी क्रमवारीत प्रगती साधली. त्यांना क्रमवारीमध्ये प्रत्येकी एका स्थानाचा फायदा झाला आहे. बुमराह आता गाेलंदाजांच्या क्रमवारीत ८१२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आला आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या कागिसाे रबाडाला सुमार कामगिरीचा फटका बसला. त्याची क्रमवारीत तीन स्थानांनी घसरण झाली. त्यामुळे ताे आता सहाव्या स्थानी आला आहे. तसेच अश्विनने ८१२ गुणांसह चाैथे स्थान गाठले आहे. यासह बुमराह आणि अश्विनला आपले टाॅप-५ मधील स्थान कायम ठेवता आले. दुसरीकडे आॅस्ट्रेलियाच्या स्मिथने फलंदाजांच्या क्रमवारीत प्रगती साधली. त्याने दुसरे स्थान गाठले. तसेच विलियम्सन टाॅप-५ मध्ये दाखल झाला आहे. त्याने आता पाचव्या स्थानी धडक मारली. दरम्यान, पाकच्या कर्णधार बाबर आझमचे क्रमवारीत नुकसान झाले. त्याची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. त्याला मागे टाकत स्मिथने दुसरे स्थान गाठले. भारतीय संघाच्या राेहित शर्मा ७३२ गुणांसह नवव्या स्थानी कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...