आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Team India's 'England Test' Now: Senior Players Like Kohli, Pujara, Bumrah Have Left, Rahul Has Not Recovered From Injury, Rohit Has Not Been Seen

टीम इंडियाची आता 'इंग्लंड टेस्ट':कोहली, पुजारा, बुमराहसारखे सीनियर खेळाडू रवाना, राहुलची दौऱ्यातून माघार, दिसला नाही रोहित

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचे खेळाडू गुरुवारी इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाले. यामध्ये माजी कर्णधार विराट कोहली, वरिष्ठ फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह यासारख्या वरिष्ठांचा समावेश आहे. पण, आघाडीचा फलंदाज लोकेश राहुल संघासोबत गेला नाही.

तो दुखापतीतून सावरला नसल्यामुळे त्याने इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतल्याचे सूत्रांकडून समजते. तो बरे होण्यासाठी जर्मनीला जाणार असल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र, BCCI कडून याबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

BCCI ने गुरुवारी सकाळी संघाच्या प्रस्थानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. पण, कर्णधार रोहित शर्माही त्यात दिसत नाही. सर्व खेळाडू सकाळी मुंबईहून निघाले. हे सर्वजण लेस्टर शहरात जाणार आहेत.

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंमध्ये माजी कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, प्रणभव कृष्णा, केएस भरत आणि हनुमा विहारी यांचा समावेश आहे.

मात्र, याबाबत बोर्डाकडून कोणतेही माहिती आलेली नाही.

BCCI ने गुरुवारी सकाळी संघ रवाना झाल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. पण, त्यात कर्णधार रोहित शर्मा दिसला नाही. सर्व खेळाडू सकाळी मुंबईहून निघाले. हे सर्वजण लेस्टर शहरात जाणार आहेत.

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंमध्ये माजी कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, के एस भरत आणि हनुमा विहारी यांचा समावेश आहे.

कसोटी मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आहे पुढे

1 ते 5 जुलै दरम्यान खेळवली जाणारी ही कसोटी पाच सामन्यांच्या मालिकेचा भाग आहे. यात टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. एक ड्रॉ खेळला गेला. या मालिकेतील शेवटचा सामना कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला होता.

शुभमन गिल ओपनिंग करू शकतो

राहुलच्या अनुपस्थितीत शुभमन गिल टीम इंडियासाठी सलामीला येऊ शकतो. कोहली हाही एक पर्याय असू शकतो. मात्र, राहुलच्या बाबतीत अद्याप बोर्डाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

हे आहे वेळापत्रक

भारत विरुद्ध इंग्लंड

5 वी कसोटी: 1-5 जुलै, एजबॅस्टन

T-20

पहिला: 7 जुलै, एजेस बाउल

दुसरा: 9 जुलै, एजबॅस्टन

तिसरा: 10 जुलै, ट्रेंट ब्रिज

वनडे

पहिला: 12 जुलै, ओव्हल

दुसरा: 14 जुलै, लॉर्ड्स

तिसरा :17 जुलै, मँचेस्टर

टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), केएस भरत (डब्ल्यूके), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.

बातम्या आणखी आहेत...