आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलिया दौरा:स्नायू दुखावल्याने बुमराह चाैथ्या कसोटीतून बाहेर, उर्वरित 4 गोलंदाजांवर मदार

सिडनी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माे. सिराज, सैनी, शार्दूल व नटराजन हे वेगवान गोलंदाज संघात, हनुमा विहारी-जडेजादेखील बाहेर

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहदेखील आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीतून बाहेर झाला. त्याचे स्नायू दुखावले आहेत. मात्र, त्याची दुखापत गंभीर स्वरूपाची नाही. आता भारतीय संघाला मायदेशी इंग्लंडविरुद्ध मालिका खेळायची आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप पाहता संघ व्यवस्थापन अधिक बुमराहबाबत अधिक धोका पत्कारू शकत नाही. आता संघातील उर्वरित गोलंदाजांना मो. सिराज (२), नवदीप सैनी (१), शार्दूल ठाकूर (१) केवळ चार गोलंदाज सामन्यांचा अनुभव आहे.

डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजनचे पदार्पण बाकी आहे. सिराज व नवदीप सैनीने याच ऑस्ट्रेलियन दौऱ्यात पदार्पण केले. त्याचबरोबर आर. अश्विन व मयंक अग्रवालच्या खेळण्याविषयी शंका आहे. अश्विनची पाठ दुखत असून मयंक सरावादरम्यान जखमी झाला. त्याचे स्कॅन करण्यात आले आहे. त्याचे विहारीच्या जागी खेळणे निश्चित होते. अशात ऋषभ पंत फलंदाज म्हणून खेळेल आणि वृद्धिमान साहाला यष्टिरक्षक म्हणून खेळावे लागेल. जर अश्विन खेळणार नसेल, तर संघ चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरेल. फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळू शकते. येत्या शुक्रवारपासून चाैथ्या आणि निर्णायक कसाेटीला सुरुवात हाेत आहे. त्यामुळे ही कसाेटी महत्वाची मानली जाते.

भारताचे अव्वल सात खेळाडू जायबंदी; नियमित कर्णधार कोहली सध्या रजेवर
दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेला वेगवान गोलंदाज मो. शमी सर्वप्रथम या मालिकेच्या स्पर्धेबाहेर झाला. त्यापाठाेपाठ वेगवान गाेलंदाज उमेश यादव जखमी झाल्याने बाहेर पडला. लोकेश राहुललादेखील मायदेशी परतावे लागले. त्यापाठोपाठ रवींद्र जडेजा, हनुमा विहारी व बुमराहसोबत मयंक जखमी झाला. सुरुवातीला कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर जाण्यापूर्वी केवळ एक कसोटी खेळला. ईशांत शर्माला पहिले संघात स्थान मिळाले नव्हते. तो तंदुरुस्त झाल्यावर स्थान देण्यात आले, मात्र तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला नाही.

बातम्या आणखी आहेत...