आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसादचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीचे अध्यक्ष हाेण्याचा प्रयत्न अपुरा ठरला आहे. बीसीसीआय आणि क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) प्रसादचा अध्यक्षपदासाठीचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्याला निवड समिती अध्यक्षपदाचा प्रबळ दावेदारही मानले जात हाेते. मात्र, सल्लागार समितीने याबाबत आपले मत मांडले. यातून त्याचा अर्ज फेटाळून लावला. यामुळे आता चेतन शर्माची दुसऱ्यांदा निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती हाेण्याची शक्यता आहे. येत्या आठवडाभरात सल्लागार समिती आणि बीसीसीआय आपल्या निवड समितीची घाेषणा करण्याच्या तयारीत आहे.
निवड समितीमधील पाच पदासाठी जवळपास २०० पेक्षा अधिक जणांना अर्ज केले हाेते. यातून आता पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. गत वर्षी आॅस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकादरम्यान भारतीय संघाने सुमार कामगिरी केली. याच पराभवाचा ठपका ठेवत बीसीसीआयने तात्काळ निवड समिती बरखास्त केली हाेती. त्यामुळे आता नव्याने ही निवड समिती तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी अर्जही मागवण्यात आले हाेते. आता निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी चेतन शर्मासह हरविंदर आणि अजय रात्रा यांच्यात चुरस रंगणार आहे. ४१ वर्षीय अजय यांच्या नावे ६ कसाेटी, १२ वनडे आणि ९९ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांची नाेंद आहे. याशिवाय त्यांनी हरियाणा संघाकडून १७ टी-२० सामने खेळले आहेत. यासह ताे सर्वात युवा निवड समिती अध्यक्ष ठरू शकेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.