आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Captain Babar Became The Fastest Hazari; Behind Kohli, Completed 1,000 Runs In 13 Innings; Pak Team Wins

क्रिकेट:कर्णधार बाबर ठरला वेगवान हजारी; कोहलीला टाकले मागे,13 डावांत 1 हजार धावा पूर्ण; पाक टीम विजयी

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलतान कर्णधार बाबर आझमने (१०३) आपल्या कुशल नेतृत्वात पाकिस्तान संघाला सलामीच्या वनडे सामन्यात शानदार विजय मिळवून दिला. पाक संघाने पहिल्या वनडेत गुरुवारी विंडीजवर ५ गड्यांनी मात केली. विंडीजने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३०५ धावा काढल्या. प्रत्युत्तरात पाक संघाने चार चेंडू आणि पाच विकेट राखून विजय संपादन केला. यासह पाक संघाने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा वनडे सामना आज शुक्रवारी रंगणार आहे. यादरम्यान कर्णधाराच्या भूमिकेत बाबरने शतकी खेळी करताना सर्वात वेगवान हजारी फलंदाज हाेण्याचा बहुमान पटकावला. त्याने १३ डावांत १ हजार धावा पूर्ण केल्या. यादरम्यान बाबरने या कामगिरीत टीम इंडियाच्या माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. कोहलीच्या नावे १७ डावांत वेगवान एक हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम नाेंद हाेता. विजयासाठी इमाम (६५) आणि रिझवानने (५९) अर्धशतकी खेळीचे माेलाचे याेगदान दिले.

बातम्या आणखी आहेत...