आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय शिबिरातून एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला एकमेव कसोटी पूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटीतून तो बाहेर पडला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक निवेदन जारी करून याला दुजोरा दिला आहे. रोहित शर्माची रॅपिड अँटीजेन चाचणी शनिवारी घेण्यात आली, असे निवेदनात म्हटले आहे. तो सध्या सांघिक हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये असून BCCI च्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.
त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह संघाचा कर्णधार असेल. मात्र, याबाबत BCCI कडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
कोरोना संसर्गामुळे अश्निन दौऱ्यावर गेला नाही
रोहितपूर्वी भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनलाही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे तो बाकीच्या खेळाडूंसोबत लंडनला गेला नाही. मात्र, आता तो बरा आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लंडनला पोहोचल्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीलाही कोरोनाची बाधा झाली होती.आता ते ठीक असून, ते सराव सामन्यात सुद्धा खेळत आहेत. तिसऱ्या दिवशी लिसेस्टरशायर विरुद्ध दुसऱ्या डावात त्याने 67 धावा केल्या.
कसोटी सामना 1 जुलैपासून
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना 1 जुलैपासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेचा हा भाग आहे. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेलेल्या टीम इंडियाने कोरोना प्रकरणामुळे शेवटचा सामना खेळण्यास नकार दिला होता. या दौऱ्यात उर्वरित एक कसोटी खेळली जात आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या 2-1 ने आघाडीवर आहे.
सराव सामन्यात टीम इंडिया 366 धावांनी आघाडीवर आहे
इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी भारत आणि लिसेस्टरशायर यांच्यात चार दिवसीय सराव सामना लीसेस्टर मध्ये खेळवला जात आहे. भारताकडे आतापर्यंत 366 धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने दुसऱ्या डावात 9 गडी गमावून 364 धावा केल्या आहेत.
त्याचवेळी, याआधी त्यांना पहिल्या डावात 2 धावांची आघाडी मिळाली होती. टीम इंडियाने पहिल्या डावात 8 विकेट गमावत 246 धावा केल्या होत्या. त्याचवेळी लीसेस्टरशायरचा संघ पहिल्या डावात 244 धावांत गारद झाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.