आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशुभमान गिल (११०) आणि चेतेश्वर पुजाराने (नाबाद १०२) झंझावाती खेळीतून टीम इंडियाचा शुक्रवारी यजमान बांगलादेश संघाविरुद्ध सलामीच्या कसाेटीतील विजयाचा दावा मजबूत केला. भारताने पहिल्या डावात बांगलादेश टीमला १५० धावांवर गुंडाळले. त्यानंतर भारताने २ बाद २५८ धावांवर आपला दुसरा डाव घाेषित केला. यासह टीम इंडियाने यजमान बांगलादेश टीमसमाेर विजयासाठी खडतर ५१३ धावांचे टार्गेट ठेवले आहे. प्रत्युत्तरात बांगलादेश संघाने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात बिनबाद ४२ धावा काढल्या. अद्याप ४७१ धावांनी पिछाडीवर असलेल्या बांगलादेश संघाचा शांताे (२५) आणि जाकीर (१७) मैदानावर कायम आहेत. भारताकडून पहिल्या डावात कुलदीप यादवने पाच बळी घेतले. यातून भारताला पहिल्याच डावात २५४ धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसरा डाव २५८ धावांवर घाेषित केला. भारताच्या शुभमानने कसाेटीत पहिल्या शतकाची नाेंद केली. तसेच पुजाराने १९ वे कसाेटी शतक साजरे केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.