आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेतेश्वर पुजारा हा एकेकाळी टीम इंडियाची समोरची भिंत असेल असे मानले जात होते, मात्र राहुल द्रविड प्रशिक्षक झाल्यानंतर त्याला संघातील स्थान गमावावे लागले. पुजाराचे पुनरागमन आता शक्य होणार नाही, असे सर्वत्र बोलले जात होते. 34 वर्षीय पुजाराला हवे असते तर तो निवृत्ती सुद्धा घेऊ शकला असता. मात्र पूजाराने टीका बाजूला ठेवून इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये दमदार वापसी केली. त्यात त्याने ससेक्सकडून खेळताना चौथे शतक झळकावले.
येथेच चॅम्पियन खेळाडू आणि सामान्य खेळाडू यांच्यातील फरक समजण्यासारखा आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून ते रणजी ट्रॉफीपर्यंत, जेव्हा त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या, त्यावेळी पुजाराने इंग्लंडमधील काउंटी चॅम्पियनशिपकडे स्वताला वळवले. मग त्याच्या मेहनतीने त्याने वेळ, परिस्थिती आणि लोकांच्या मनातील भावना बदलल्या.
केवळ 133 चेंडूत काढल्या 100 धावा
पुजारा गेल्या एक महिन्यापासून इंग्लंडच्या प्रसिद्ध काउंटी चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या विभागात ससेक्स क्रिकेट क्लबकडून खेळत आहे. या क्लबकडून खेळताना पुजाराने आतापर्यंत चार सामने खेळले असून प्रत्येक सामन्यात त्याने आपल्या बॅटने शतक झळकावले आहे. शनिवारी, 7 मे रोजी पुजाराने मिडलसेक्स विरुद्ध दुसऱ्या डावात शतक झळकावले.
पुजाराच्या शतकाचा वेगही अतिशय वेगवान होता. सहसा त्याच्या संथ फलंदाजीची टीका होत असलेल्या पुजाराने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये केवळ 133 चेंडूत सलग चौथे शतक झळकावले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्याने 149 चेंडूत 125 धावा केल्या, ज्यात 16 चौकार आणि दोन शानदार षटकारांचा समावेश होता.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत मिळू शकते स्थान
ससेक्ससह हा काउंटी हंगाम पुजारासाठी चांगला जात आहे. तो या संघाकडून प्रथमच खेळत असून आतापर्यंत प्रत्येक सामन्यात त्याने शतक किंवा द्विशतक झळकावले आहे. त्याने आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये 7 डाव खेळले आहेत, ज्यामध्ये 2 द्विशतकांसह एकूण 4 शतके त्याच्या बॅटने झळकावली आहेत.
भारतीय संघाला या वर्षी जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे, जिथे गेल्या वर्षीच्या मालिकेतील शेवटची कसोटी खेळली जाणार आहे. साहजिकच या कसोटीसाठी पुजाराने संघात आपले स्थान निश्चित होण्यासाठी तो प्रबळ दावेदार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.