आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स लीग:मँचेस्टर सिटी सर्वात जलद 200 गोल करणारा पहिला संघ

लिस्बन/पॅरिस6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मँचेस्टर सिटीने यजमान स्पोर्टिंगला 5-0 ने हरवले
  • लीगमध्ये 97 सामन्यांत 200 गोलचा आकडा गाठला
  • ​​​​​​​एमबापेच्या अतिरिक्त वेळेतील गोलच्या जोरावर पीएसजी विजयी ​​​​​​​

जगातील सर्वात मोठी फुटबॉल लीग दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर परतली. चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना मंगळवारी रात्री सुरुवात झाली. यात इंग्लिश क्लब मँचेस्टर सिटीने पोर्तुगालचा क्लब स्पोर्टिंगचा त्यांच्या घरच्या मैदानावर ५-० असा पराभव केला. सिटीने त्यांच्या सर्वात मोठ्या अवे विजयशी बरोबरी केली. सिटीचे चॅम्पियन्स लीगमध्ये २०० गोल पूर्ण झाले. सिटी सर्वात जलद अशी कामगिरी करणारा संघ बनला. सिटीने ९७ सामन्यांत हा आकडा गाठला. सिटी २००+ गोल करणारा लीगमधील १४ वा संघ बनला.

पीएसजीने पहिल्या लेगमध्ये आपल्या घरच्या पार्क डेस प्रिन्सेस मैदानावर १३ वेळेचा चॅम्पियन रिअल माद्रिदला हरवले. किलियन एमबापेने अतिरिक्त (९०+४) वेळेत नेमारच्या असिस्टवर गोल केला. त्याचा सत्रातील २२ वा गोल ठरला. मेसी ६२ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करण्यात अपयशी ठरला.

  • एमबापेच्या गोलच्या जोरावर पीएसजीने रिअल माद्रिदला हरवले
  • 127 गोल झाले स्टर्लिंगचे. तो सिटीच्या अव्वल-१० सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत.
  • 150 वा सामना होता फोडेनचा सिटीकडून. त्याचे एकूण ४० गोल केले.
बातम्या आणखी आहेत...