आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Change the pitch to encourage women is wrong according to indian fast bowler shikha pandey enable the technical side

महिला क्रिकेट :महिलांच्या प्रोत्साहनासाठी खेळपट्टीत बदल चुकीचा, भारतीय वेगवान गाेलंदाज शिखा पांडेच्या मते तांत्रिक बाजू सक्षम करा

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय वेगवान गोलंदाज शिखा पांडे महिला क्रिकेटला अधिक लोकप्रिय बनवण्यासाठी हलका चेंडू आणि लहान खेळपट्टी सारख्या सूचना अनावश्यक मानते. तिने आयसीसीला म्हटले की, अधिक चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी नियमांशी छेडछाड करण्यात येऊ नये. शिखाने हलका चेंडू व लहान खेळपट्टीची तुलना १०० मीटर धावण्याच्या प्रकाराशी करून समजावले. ‘ऑलिम्पिक १०० मीटर महिला धावपटू पदकासाठी आणि पुरुष खेळाडूंप्रमाणे वेळ नोंदवण्यासाठी ८० मीटर धावत नाही.’ खेळपट्टीची लांबी कमी करणे योग्य नाही. चौकार सीमा देखील कमी करू नये. येथेही अनेक मोठे हिटर आहेत. चेंडूचा आकार लहान होऊ शकतो, मात्र त्याच्या वजनात बदल करू नये.

खेळाचा चांगला प्रचार करून प्रेक्षकांना आकर्षित केले जाऊ शकते. डीआरएस, स्निको, हॉटस्पॉट सारख्या तंत्राचा वापर केला पाहिजे,असेही १०४ आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या गोलंदाजाने शिखाने यादरम्यान सांगितले.

0