आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:कोच द्रविड आणि कर्णधार राहुलला घ्यावे लागणार आता तीन निर्णय, 9 जुनपासून भारत-द. आफ्रिका टी-20 मालिका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या ९ जूनपासून यजमान टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर मालिका खेळणार आहे.

याच मालिकेच्या माध्यमातून टीम इंडियाला यंदाच्या सत्रात शेवटी ऑक्टाेबर- नाेव्हेंबरमधील टी-२० फाॅरमॅटच्या वर्ल्डकपची तयारी करण्याची मोठी संधी आहे. याच मालिकेदरम्यान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार लोकेश राहुलला महत्त्वाचे तीन मोठे निर्णय घ्यावे लागणार आहेत. यामध्ये हार्दिकची बॅटिंग पाेझिशन, कर्णधार राहुलचा ओपनिंग पार्टनर व वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या संधीबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. हार्दिकने आयपीएलमध्ये चौथ्या स्थानावरून १३१.२६ च्या स्ट्राइक रेटने ४८७ धावा काढल्या.

बातम्या आणखी आहेत...