आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केएल राहुलला पुन्हा संधी मिळणार:कोच राहुल द्रविडने ओपनरवर दाखवला विश्वास, उद्या बांग्लादेशशी सामना

स्पोर्ट्स डेस्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज लोकेश राहुलची सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकातील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. राहुलला सातत्याने संधी दिली जात असल्याने संघ व्यवस्थापनावर टीका होत आहे. अनेकांचे म्हणणे आहे की जर राहुल फॉर्ममध्ये नाही तर त्याच्या जागी ऋषभ पंतला सलामीला जाण्याची संधी का दिली जात नाही?

दुसरीकडे संघ व्यवस्थापनाकडून राहुलची पाठराखण केली जात आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी लोकेश राहुलवर विश्वास दर्शवत त्याची पाठराखण केली आहे. द्रविड यांनी स्पष्ट म्हटले आहे की, राहुल पुढेही खेळेल.

ऑस्ट्रेलियातील स्थितीनुसार राहुल पूर्णपणे योग्य

लोकेश राहुलवर उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवर द्रविड यांनी म्हटले आहे की, मला वाटते की राहुल एक चांगला खेळाडू आहे. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला राहिला आहे. माझ्या मते तो चांगली फलंदाजी करत आहे. या गोष्टी टी-20 मध्ये सामान्य आहेत. सलामीला खेळणे नेहमीच कठीण राहिले आहे. हे सोपे नाही.

ते पुढे म्हणाले, ही स्पर्धा कुणासाठीही सोपी नाही. आम्हाला राहुलची योग्यता माहिती आहे आणि अनेकदा ती पाहिलीही आहे. तो ऑलराऊंडर खेलाडू आहे आणि ऑस्ट्रेलियातील परिस्थितीची त्याला पूर्ण माहिती आहे. येणाऱ्या सामन्यांत तो चांगला खेळेल अशी आम्हाला आशा आहे.

राहुलला संघाचा पाठिंबा

द्रविड पुढे म्हणाले, आम्ही अनेकदा खेळाडूंशी चर्चा करतो. आमचे संबंध चांगले झाले आहेत आणि राहुलला माहिती आहे की संघ त्याच्या पाठिशी आहे. संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंमध्ये स्पष्टता आहे. त्याच्या कारकिर्दीत अशी कठीण वेळ आधीही आली आहे आणि त्याने नेहमी कमबॅक केले आहे. कर्णधार रोहितलाही त्याच्या खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला माहिती आहे की राहुल किती अटॅकिंग बॅटिंग करू शकतो.

वॉर्म अप सामन्यानंतर लय बिघडली

सुपर-12 मधील तीन सामन्यांत लोकेश काही खास करू शकला नाही. मात्र वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरोधातील सराव सामना आणि ऑस्ट्रेलियाविरोधातील वॉर्म अप मॅचमध्ये त्याने दोन अर्धशतके झळकावली होती. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरोधात 54 चेंडूत 74 धावा त्याने केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरोधात 57 धावा केल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...