आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:भारत-इंग्लंडच्या खेळाडूंची काेराेना टेस्ट निगेटिव्ह; सरावाचा मार्ग झाला माेकळा

चेन्नईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान भारत आणि इंग्लंड यांच्यातील सलामीच्या कसाेटी सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात हाेत आहे. काेराेनाचा धाेका लक्षात घेऊन या दाेन्ही संघांच्या खेळाडूंची काेविड-१९ टेस्ट करण्यात आली. या वेळी दाेन्ही संघांच्या खेळाडूंच्या या टेस्टचा अहवाल हा निगेटिव्ह आला. त्यामुळे आता या संघांतील खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. याशिवाय या संघांच्या सराव करण्याचा मार्गही माेकळा झाला. त्यामुळे आता इंग्लंडचा संघ सलामी कसाेटीच्या तयारीसाठी आज मंंगळवारपासून सराव सुरू करणार आहे.

श्रीलंकेतील मालिका विजयाची माेहीम फत्ते केल्यानंतर इंग्लंडचा संघ थेट भारतामध्ये दाखल झाला. २७ जानेवारी राेजी या संघाचे चेन्नईत आगमन झाले. त्यामुळे या टीमच्या खेळाडूंना क्वाॅरंटाइन करण्यात आले. आता हा संघ यातून बाहेर पडणार आहे. त्यामुळे टीम या ठिकाणी सरावाला सुरुवात करू शकेल. नुकत्याच मिळवलेल्या मालिका विजयाने इंग्लंडचा संघ सध्या फाॅर्मात आहे. मात्र, इंग्लंडच्या टीमला आता या दाैऱ्यात मालिका विजयासाठी माेठी कसरत करावी लागेल. कारण, भारताचा संघही नुकताच आॅस्ट्रेलिया दाैऱ्यात एेतिहासिक विजयाची पताका फडकवून मायदेशी परतला आहे. याशिवाय आता टीममध्ये नियमित कर्णधार विराट काेहलीही खेळणार आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने यजमान आॅस्ट्रेलियाविरुद्धची कसाेटी मालिका जिंकली. त्यामुळे आता हाच कित्ता आपल्या घरच्या मैदानावरही गिरवण्याचा यजमान टीम इंडियाचा मानस आहे. याच मैदानावर भारताने डिसेंबर २०१६ मध्ये इंग्लंडला डाव आणि ७५ धावांनी पराभूत केले हाेते.

५ वर्षांनंतर चेन्नईत कसाेटी :
तब्बल पाच वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर चेन्नईच्या स्थानिक क्रिकेटप्रेमींना कसाेटी सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. या ठिकाणी २०१६ नंतर पहिल्यांदाच कसाेटीचे आयाेजन करण्यात आले. भारत व इंग्लंड मालिकेतील सुरुवातीचे दाेन कसाेटी सामने चेन्नईत हाेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...