आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकसाेटी सामन्यातील अनिर्णीतचा निकाल क्रिकेटप्रेमींना फारचा उत्साहित करणारा नसताे. पाच दिवसांच्या या खेळाकडे चाहत्यांच्या पसंतीमध्ये घसरण झाली आहे. यातूनच सध्या क्रिकेटच्या टी-२० फाॅरमॅटच्या लाेकप्रियेमध्ये झपाट्याने वाढ झाली. याच फाॅरमॅटने कसाेटीला मागे टाकले. नुकतीच पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रावळपिंडी कसाेटी झाली. यादरम्यान इंग्लंड संघाने आव्हानात्मक परिस्थितीत या कसाेटीत विजय संपादन केला. यादरम्यान कसाेटीसाठीची खेळपट्टी ही अधिकच सुमार असल्याची क्रिकेटप्रेमींनी टीका केली. डेड आणि ड्राॅसाठीची पिच तयार केल्याचा आराेपही चाहत्यांनी आता पाकिस्तान क्रिकेट मंडळावर (पीसीबी) लावला आहे. या कसाेटीच्या सुरुवातीच्या दाेन दिवसांदरम्यान ८००+ धावा निघाल्या. त्यामुळे ही कसाेटी ड्रॉ हाेणार असल्याचे संकेत हाेते. मात्र, इंग्लंडने सर्वाेत्तम खेळीतून विजयश्री खेचून आणली. पाकिस्तानमध्ये आयाेजित कसाेटी सामन्यादरम्यान निकाल लावणे अधिकच आव्हानात्मक असते. यादरम्यान संघांची कसाेटी लागते. या मैदानावरील ४७ टक्के कसाेटी सामने ड्रॉ झाल्याची नाेंद आहे. याच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन मैदानावर निकालाची मजबूत हमी असते. येथील मैदानावर कसाेटी सामने ड्रॉ हाेण्याची टक्केवारी कमी आहे. या ठिकाणी ८० टक्के कसाेटी सामन्यांचे निकाल लागले आहेत. फक्त २० टक्के कसाेटी सामनेच ड्रॉ झाले आहेत. दुसरीकडे भारत आणि न्यूझीलंड येथेही कसाेटी ड्रॉ हाेण्याचे प्रमाण लक्षवेधी आहे. भारतामध्ये याची टक्केवारी ४० आणि न्यूझीलंडमध्ये ३९ आहे.
भारतात ४० टक्के कसाेटी ड्राॅ यजमान सामने निकाल ड्रॉ ड्रॉ% पाकिस्तान 160 84 76 47% भारत 282 167 114 40% न्यूझीलंड 224 136 88 39% विंडीज 261 162 99 38% इंग्लंड 546 362 184 34% झिम्बाव्वे 63 45 18 29% श्रीलंका 152 110 42 28% दक्षिण आफ्रिका 246 190 56 23% बांगलादेश 70 56 14 20% ऑस्ट्रेलिया 437 353 82 18%
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.