आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी नाॅलेज:वनडे सुपर लीग मध्ये 13 संघ, अव्वल 8 पात्र, 30 जुलैला सुरुवात, 31 मार्च 2022 रोजी फायनल

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वनडेतील चार वर्षांच्या विक्रमी कामगिरीतून श्रीलंका नव्हे, अफगाणिस्तानही प्रबळ दावेदार

आयसीसीने ३० जुलैपासून विश्वचषक सुपर लीगला सुरुवात केली आहे. त्याचा उद्देश वनडेला रोमांचक बनवणे आणि सोबत छोट्या संघांना विश्वचषक खेळण्याची संधी मिळण्यासाठी. लीगमध्ये १३ संघांचा समावेश करण्यात आला आहे. यात आयसीसीचे १२ पूर्ण सदस्य असलेले संघ असतील. या १२ संघांचा मागील चार वर्षांचा आलेख पाहिल्यास अफगाणिस्तान संघ आठव्या स्थानी आहे. त्याचे नियमित प्रदर्शन राहिल्यास आलेखाप्रमाणे ते २०२३ च्या विश्वचषकासाठी पात्रता मिळवेल. अशात माजी चॅम्पियन श्रीलंका व विंडीजला पात्रता स्पर्धा खेळावी लागेल. जर पूर्वीप्रमाणे क्रमवारी नुसार संघांना संधी दिली असती तर श्रीलंका टीम विश्वचषक खेळली असती. अफगाणिस्तानला पात्रता स्पर्धा खेळावी लागली असती. आता सुपर लीगचे आयाेजन हाेत आहे. आयसीसीने यापूर्वी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू केली. आगामी टी-२० चॅम्पियनशिपची ते तयारी करत आहेत.

क्रमवारीनुसार संघ ठरत हाेते सुरुवातीला पात्र; आता सुपर लीगमधून प्रवेश निश्चित

कारण-1 . संघांना २ वर्षापुर्वीच वर्ल्डकपचे तिकीट; दिग्गजांना संधी

२०१९ विश्वचषकाचे सामने मे ते जुलैदरम्यान खेळवण्यात आले. मात्र, सप्टेंबर २०१७ च्या क्रमवारीनुसार यजमान इंग्लंड व अव्वल ७ संघांना विश्वचषकाचे तिकीट पहिलेच मिळाले होते. म्हणजे विश्वचषक सुरू होण्याच्या दोन वर्षांपूर्वीच. अशात मोठे संघ सामन्यासाठी आपल्या मोठ्या खेळाडूंना राखून ठेवत होते, नव्या खेळाडूंना संधी देत होते.

कारण-2. २०१५ नंतर आॅस्ट्रेलिया चार वर्षात सातव्यांदा यशस्वी संघ

२०१५ विश्वचषक ऑस्ट्रेलियाने आपल्या घरात शानदार विजयासह जिंकला होता. मात्र, त्यानंतर त्यांच्या प्रदर्शनात घसरण झाली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वनडे ऐवजी कसोटीला अधिक प्राधान्य दिले. २०१५ ते २०१९ दरम्यान ऑस्ट्रेलिया संघ ६६ पैकी केवळ ३३ सामने जिंकू शकला. ३३ सामन्यांत पराभव झाला. यादरम्यान अफगाणिस्तानने ४८ पैकी २६ सामने जिंकले.

कारण-3. छाेट्या संघांना बलाढ्य टीमविरुद्ध खेळण्याची संधी

लीगमध्ये सर्व संघांना आठ मालिका खेळायच्या आहेत. अशात छोट्या संघांना मोठ्या संघांशी खेळण्याची संधी मिळेल. त्यांच्या कामगिरीत सुधारणा होईल व त्यांच्या खेळाडूंना शिकण्यास मिळेल. आयर्लंडची टीम २००६ पासून वनडे सामने खेळत आहे. मात्र, भारत त्यांच्या विरुद्ध केवळ ३, न्यूझीलंड चार आणि ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकाशी ५-५ वनडे खेळले आहेत.

सर्व सामन्यात आम्ही दिग्गज खेळाडूंना खेळवणार : लेंगर

येथे नव्या प्रकारचे आव्हान असेल. यात आम्हाला सर्वांना आपले उत्कृष्ट खेळाडू खेळवावे लागतील. कोविड-१९ नंतर खेळाडूंसाठी पुढे फिटनेसचे मोठे आव्हान असेल. कारण अनेक मालिका रद्द झाल्या आहेत आणि त्यांना कमी कालावधीत अधिक सामने खेळावे लागतील, असे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लेंगर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...